एक्स्प्लोर
...मग आरक्षणासाठी ब्राम्हणांचाही विचार करावा: भालचंद्र मुणगेकर
मुंबई: 'मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर ब्राह्मणांनासह सर्वच समजातील आर्थिक दुर्बल घटकांचा विचार व्हावा.' असं मत माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
'सर्वच दुर्बलांचा आरक्षणासाठी विचार व्हावा'
मराठा मोर्चामधील आरक्षणाच्या मागणीवर सरकारनं तातडीनं विचार करायला हवा. वटहुकूम काढून मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यायला हवे. ही समता अभियानाची भूमिका आहे. असं मुणगेकर म्हणाले.
आर्थिक निकषांवर जर आरक्षण द्यायचे असेल तर केवळ मराठा समाजच नव्हे तर इतर समाजातील दुर्बल घटकांनाही आरक्षण देणं गरजेचं आहे. असंही मुणगेकर म्हणाले.
'अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही'
दरम्यान, याचवेळी मुणगेकरांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी देखील भाष्य केलं. 'अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर झाल्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांनी द्यावे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, तो रद्द करणं कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही. पण अॅट्रॉसिटीबाबतच्या या चर्चेमुळे दलित समाजात मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. असं म्हणत मुणगेकरांनी दलित समाजामध्ये असणारी भीती व्यक्त केली.
राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहे. याविषयी बोलताना मुणगेकर म्हणाले की, 'राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघत आहेत पण या मोर्चांमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील.'
'...तेव्हा मराठा समाजाची संवेदनशीलता दिसली नाही'
मराठा मोर्चांवरही मुणगेकरांनी टीकास्त्र सोडलं. 'गेल्या दीड वर्षात ४७३ महिलांवर बलात्कार झाले, तेव्हा मराठा समाजाची संवेदनशीलता दिसली नाही. कोणतीही विशिष्ट जात हा दलित समाजाचा शत्रू नाही. इथली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थाच दलित समाजाचा शत्रू आह असं म्हणता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement