एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
समर्थकांनी धमक्या दिल्या नाहीत, भय्यूजींकडून आरोपांचं खंडन
धुळे : सकल मराठा मोर्चाच्या आयोजकांना माझ्या समर्थकांनी कोणताही त्रास दिलेला नाही, असं स्पष्टीकरण भय्यूजी महाराज यांनी दिलं आहे. समर्थकांनी मराठा मोर्चेकऱ्यांना धमक्या दिल्याच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलं.
'आम्ही कायद्याला जपणारी माणसं आहोत, त्यामुळे आमच्यावर शंका असल्यास आम्ही कारवाईला सामोरे जायला तयार आहोत' असंही भय्यूजी महाराज म्हणाले. भय्यू महाराजांचे समर्थक आपल्याला धमक्या देत आहेत आणि त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचं लेखी पत्र सकल मराठा मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलं आहे.
भय्यू महाराजांनी मोर्चाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सकल मराठा मोर्चातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर सातत्यानं भय्यू महाराजांचे समर्थक आपल्याला धमक्या देत असल्याचं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर काही जणांना सकल मराठा मोर्चाच्या लोकांना अब्रू नुकसानीच्या नोटीसाही धाडल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
'भय्यू महाराज समर्थकांकडून धमक्या, जीविताला धोका'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement