एक्स्प्लोर
बेळगावच्या स्केटिंगपटूची 'गिनीज बुक'मध्ये नोंद
अभिषेकने 100 मीटर इनलाईन स्केटिंगमध्ये नोंदवलेल्या विक्रमी वेळेची दखल गिनीज बुकने घेतली.

बेळगाव : बेळगावचा स्केटिंगपटू अभिषेक नवलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अभिषेकने 100 मीटर इनलाईन स्केटिंगमध्ये नोंदवलेल्या विक्रमी वेळेची दखल गिनीज बुकने घेतली.
अभिषेकने 100 मीटर इनलाईन स्केटिंगमध्ये 16.92 सेकंदाची वेळ नोंदवली होती. 26 फेब्रुवारी 2018 रोजी अभिषेकने हा विक्रम नोंदवला होता. नुकतंच त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे.
अभिषेक नवले आर. एन. शेट्टी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून तो स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे.
अभिषेकला आई सुजाता आणि वडील संजय यांनी सुरुवातीपासूनच स्केटिंगसाठी प्रोत्साहन दिलं. त्याला उमेश कलघटगी, प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसणे, योगेश कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
