एक्स्प्लोर

Belgaum : मोठी बातमी : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा थांबवल्यानंतर आता दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार

Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा थांबवल्यानंतर आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्री तणाव कमी करण्याच्या भूमिकेतून सीमा भागात जाणार आहेत.

Maharashtra Ekikaran Samiti and two ex minister of Maharashtra : महाराष्ट्र एकीकडे समितीला बेळगावमध्ये मेळावा घेण्यापासून थांबवले जात आहे. याबाबत आता महाराष्ट्र विधीमंडळात पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. दरम्यान, आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार आहेत. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांनी सीमा भागात जाण्याचा निर्णय घेतला. सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. या प्रस्तावानंतर 12 डिसेंबर रोजी दोन माजी मंत्री चर्चेसाठी जाणार आहेत. 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात छोटेखाणी सभा होणार आहे. चर्चेत सिमाभागातील तणाव कमी करण्याचा  प्रयत्न राहणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

2004 सालापासून बेळगाव मध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते... याच अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिक बेळगावमध्ये महामेळावा घेत असतात...या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महामेळावा घेण्याचे ठरवले...मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी ठेवलं आहे..

ठाकरे गटाचा राज्यपालांच्या अभिभाषणावर  बहिष्कार 

ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू म्हणाले, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर  आमच्या पक्षाने बहिष्कार टाकला आहे. बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे.  महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा.   राज्यपालांनी यादीच्या भाषणांमध्ये सुद्धा या गोष्टी बोलून दाखवले आहेत. मात्र अन्याय काय कमी झाला नाही. महाराष्ट्र एकीकडे समितीला तिथे मेळावा घेण्यापासून थांबवले जाते.  

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे.  सरकार कोणाचे असू दे आम्ही त्या ठिकाणच्या मराठी माणसाच्या बाजूने आहे.  आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर  बहिष्कार टाकत आहोत.  प्रत्येक वेळी राज्यपाल अभिभाषणामध्ये सांगतात की हा प्रश्न आम्ही सोडूवू.. मात्र प्रश्न सोडवला जात नाही आणि जनतेची फसवणूक होते. गरज पडल्यास आमची शिवसेना बेळगाव कारवार मध्ये मराठी माणसासाठी जाईल. वेळ आली तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा बेळगाव कारवारमध्ये जाऊ शकतात , असा इशाराही प्रभू यांनी दिला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rohit Patil On Devendra Fadnavis: रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली; देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane : सवंगडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री व्हावंPune Pub : पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना Condom आणि ORS च्या पाकिटांचं वाटपDeepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नकाSrinagar To Jammu Railway Snowfall : बर्फाची चादर,रेल्वेची सफर; श्रीनगर-जम्मू स्वर्गाची सफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Embed widget