Rohit Patil On Devendra Fadnavis: रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली; देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर, VIDEO
Rohit Patil On Devendra Fadnavis: रोहित पाटील भाषण करत असताना सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसल्याचे पाहायला मिळाले.
Rohit Patil On Devendra Fadnavis मुंबई: विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद रोहित पाटील (Rohit Patil) यांनी पहिलंच भाषण केलं. रोहित पाटील सभागृहातील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यामुळे रोहित पाटील भाषण करत असताना सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसल्याचे पाहायला मिळाले.
रोहित पाटील नेमकं काय म्हणाले?
बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. जसा तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसं मी ही तरुण आमदार आहे. एक नंबरच्या वकिल यांच्याकडे जसं लक्ष असत तसं माझ्याकडे ही असूद्या कारण मी ही वकिली पुर्ण करतोय. सर्वसामान्य लोकांच्या हिताचं आवाज याकडे तुम्ही लक्ष द्या..., अशी मागणी रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
रोहित पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गुगली-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचंही अभिनंदन...यावेळी रोहित पाटील यांनी एक वाणी बोलावून दाखवली. 'अमृता'हून ही गोड नाव तुझं देवा असं संतांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही ही गोड वागणुक तुम्ही आम्हाला द्यावी, अशी देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे विनंती करतो, असं रोहित पाटील म्हणाले. रोहित पाटील अमृताहूनही गोड नाव तुझं देवा, असं म्हटल्याने देवेंद्र फडणवीसांनाही हसू आले. कारण देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचं नाव अमृता फडणवीस आहे. यानंतर मी मुद्दाहून अमृताहून असं म्हटलं, अशी थेट गुगली रोहित पाटील यांनी टाकली.
जयंत पाटील काय म्हणाले?
विरोधी पक्ष हा किती मोठा किंवा लहान आहे यापेक्षा तो जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम करत असतो. दादांनी आपल्या भाषणात काही मुद्दे मांडले. आम्ही तुम्हाला चॅलेंज करतच नाही, तुमची संख्या जास्तच आहे. तुमच्याकडे 237 आमदारांचे संख्याबळ आहे. आता तु्म्ही तिघांनी मन एवढं मोठं केलं पाहिजे की, आपल्या बाजूने 237 नव्हे तर 288 जणांचं सभागृह आहे, असे मानले पाहिजे. आम्ही यापूर्वी सभागृह आणि निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन तुम्हाला लक्ष्य केले. पण जनतेने त्यानंतर निकाल दिला आहे. त्यामुळे आता तु्म्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवाल, अशी अपेक्षा मी करतो, असे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.