एक्स्प्लोर

Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  

Gautam Adani Stocks: अदानी ग्रुपच्या काही कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाल्याचं दिसून आलं. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 175 रुपयांनी वाढला.

Adani Group Stocks मुंबई: गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपसाठी 2024 या वर्ष चढ उताराचं राहिलं. या वर्षाच्या शेवटच्या दिवसात अदानी ग्रुपच्या 11 कंपन्यांपैकी 9 स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी उद्योग समुहाच्या 11 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. बाजार बंद होताना काही कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज 2585 रुपयांवर आहे. वेंचुरा सिक्युरीटीजनं गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 7.26 टक्क्यांनी वाढला.  

 
अदानी उद्योगसमुहाच्या कंपन्यांसाठी 2024 चा शेवट चांगला होताना दिसत आहे. मंगळवारी  2024 मधील शेवटचं ट्रेडिंग सेशन होणार आहे. अदानी उद्योग समुहाच्या एकूण 11 पैकी 9 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळतेय. आज या कंपनीचा शेअर बाजार बंद झाला तेव्हा 2585 रुपयांपर्यंत पोहोचला. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 175 रुपयांची वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्ये 14.99 टक्क्यांची वाढ झाली असून आज बाजार बंद झाला तेव्हा शेअर 781.15 रुपयांवर आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 101.85 रुपयांनी वाढ झाली आहे.  

11 पैकी  किती स्टॉक्समध्ये तेजी 

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. आज अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 7.16 टक्क्यांची  वाढ झाली असून शेअर 543.05 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअरच्या दरात 36.30 रुपयांची वाढ झाली आहे.  

अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअरमध्ये  2.53 टक्के तेजी होती. 20.40 रुपयांनी शेअर वाढून 826.35 रुपयांवर पोहोचला आहे. 

अदानी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये 1.71 टक्क्यांची वाढ झाली असून आज 18 रुपयांची वाढ झाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1072 रुपयांवर आहे. 

एसीसी लिमिटेडटच्या शेअरमध्ये 5.70 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.  अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये देखील 1.45 रुपयांची घसरण झाली. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये  1 टक्क्यांची वाढ झाली असून बाजार बंद झाला तेव्हा शेअर 164 रुपयांवर होता.  संघी इंडस्ट्रीज आणि अदानी विल्मरच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.  

21 नोव्हेंबरला अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण

2024 हे वर्ष अदानी ग्रुपसाठी चढ उतार असणारं राहिलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह इतर 7 जणांर 2250 कोटींच्या लाचखोरीचे आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. अदानी ग्रुपनं हे आरोप फेटाळले होते. मात्र, त्या दिवसानंतर अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि अदानी ग्रीनच्या संचालकांनी अमेरिकेतली न्याय विभाग आणि अमेरिका सिक्युरीटीज अँड एक्सचेंज कमिशनचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप फेटाळले होते. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget