एक्स्प्लोर
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं शिवसेनेने रोखली

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एका भाषिक मुद्द्यांवरुन वाद तापला आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या सीमेवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं अडवली आहेत.
कर्नाटक दिनी बेळगावात काळा दिवस म्हणून एक फेरी काढण्यात आली. या फेरीत सहभागी झालेल्या 40 मराठी तरुणांना कर्नाटक सरकारने अटक केली. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. त्याच्या निषेधार्थ आज कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात अडवली.
महापौर, उपमहापौरांच्या केबिनला काळंं फासलं!
दुसरीकडे कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज महापौर आणि उपमहापौर यांची केबिन आणि नाम फलकाला काळं फासलं. या प्रकरणी चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. बेळगावात काळा दिवस म्हणून काढलेल्या फेरीत महापौर आणि उपमहापौरही सहभागी झाल्याने वाद उभा राहिला.
त्यांना विरोध करण्यासाठी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापौर, उपमहापौर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांच्या केबिनलाही काळं फासलं.
काळा दिवस फेरीत हजेरी लावणाऱ्या महापौरांना कर्नाटकच्या नगरविकासखात्याने नोटीसही बजावली आहे. या नोटीसमध्ये बेळगाव नगरपालिका बरखास्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
