एक्स्प्लोर

Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत.

Dyanradha Multistate fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवल्याचे आरोप असणाऱ्या या पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली असून या चारही शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जास्तीच्या व्याजाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणेमुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

ईडीकडून एकूण १०२ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेटबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश

 बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून  हाँगकॉंगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल करत घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकरने  दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे निर्देश दिले आहेत. सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत येणार आहे. 

या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्हे

मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्थाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM :  25 Sept 2024 : ABP MajhaChandrashekhar Bawankule:बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती: विखे-पाटिलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil : प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
मुक्ता आर्टसचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् अप्पर सर्किट लागलं, गुंतवणूकदार झाले मालामाल
सुभाष घईंच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् काही वेळातच अप्पर सर्किट लागलं
Supriya Sule: 'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
Embed widget