एक्स्प्लोर
Advertisement
अंबाजोगाईत जन्मलेल्या मत्स्यपरीचा 15 मिनिटांत करुण अंत!
या बाळाला जन्म देणारी महिला ऊसतोड कामगार आहे.
बीड : बीडमधील अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात मत्स्यपरीच्या रुपातील बाळाचा जन्म झाला. पण जन्माच्या अवघ्या 15 मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात आज सकाळी 9 वाजता दोन पायांऐवजी एकच पाय आणि लिंग नसलेल्या बाळाचा जन्म झाला. वैद्यकीय परिभाषेत याला सिरेनोमेलिया म्हणतात. सिरेनोमेलियाला मर्मेड सिंड्रोमही (मत्स्यपरी) म्हटलं जातं. एका लाखात एक असं उदाहरण पाहायला मिळतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
पट्टीवडगाव इथल्या एक महिलेला काल सायंकाळी अंबाजोगाई रुग्णालायत प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी आठच्या सुमारास तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. प्रसुती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डॉ. प्रियंका खराणे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी तिची प्रसूती केली. साधारणपणे सकाळी नऊच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला.
हे बाळ बाहेर येत असतानाच एका अजब घटनेचे साक्षीदार बनणार आहोत, याची कल्पना उपस्थित डॉक्टरांना आली. दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेलं हे बाळ असल्याचं डॉक्टरांनी पाहिलं. या महिलेची प्रसूती नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघ्या 15 मिनिटांचच आयुष्य मिळाले.
या बाळाला जन्म देणारी महिला ऊसतोड कामगार आहे. या माताने गर्भधारणेनंतर कोणतेही औषधोपचार घेतलेले नाहीत. शिवाय नऊ महिन्यात एकदाही तपासणी केली नसल्याने, बाळाच्या शरीराबाबत तिला माहितीच नव्हती. एकीकडे आरोग्य विभाग गरोदर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असल्याचं सांगत आहे. मात्र या महिलेच्या उदाहरणावरुन तिची सोनोग्राफी टेस्ट झाली नव्हती, हेच स्पष्ट होतं.
हे बाळ आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागातील म्युझियममध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न चालू असल्याचंही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
जळगाव
भविष्य
Advertisement