एक्स्प्लोर
तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या कामगारांवर अस्वलाचा हल्ला, तिघांचा मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वे स्टेशनजवळच्या खरकाडा जंगलात अस्वलानं केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अस्वलानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जणांच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या उपचारासाठी जखमींना चंद्रपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. बिसन कुळमेथे (५५ वर्ष), फारुख शेख (३२ वर्ष) रंजना राऊत (३५ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या अस्वलानं २ ते ३ वेगवेगळ्या ठिकाणी केला हल्ला केला. ज्यामध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या घटनास्थळी वनविभागाचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून अस्वलाचा शोध सुरु आहे. दरम्यान, या अस्वलानं वारंवार असे हल्ले केल्यानं ग्रामस्थांनी त्याल गोळी घालून ठार करण्यात यावं अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























