एक्स्प्लोर

सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्याचं विषप्राशन

सोलापूर : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका सामाजिक कार्यकर्त्याने विष प्राशन केलं. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्यासमोर हा प्रकार घडला. बेकायदा कामकाज रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा निषेध करत बशीर जहागीरदार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. टेंभुर्णी गावात बांधलेलं सभागृह खुल करावं अशी त्यांची मागणी आहे. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या सभागृहावर आमदार पुत्राने ताबा घेतला आहे. या सार्वजनिक सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी विठ्ठल बाजार स्थापन केला आहे. वास्तविक पाहता गावातल्या लोकांना सार्वजनिक उपक्रमासाठी हे सभागृह बांधण्यात आला होत. पण शिंदे यांनी आपल्या समर्थकांना किराणा दुकान चालवण्यासाठी या सभागृहात विठ्ठल बाजार सुरु केला. याविरोधात बशीर जहागीरदार लढत आहेत. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. 30 सप्टेंबर पर्यंत हे सभागृह खुल करून द्यावं, अशी त्यांची मागणी होती. पण राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन कारवाई करत नव्हतं. याविरोधात आवाज उठवत कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा गेल्या महिन्यात बशीर जहागीरदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. आज जिल्हधिकारी कार्यालयात बशीर यांनी विष प्राशन केलं. बशीर जहागीरदार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरु आहेत. टेंभुर्णीमधील बेकायदा व्यापारी गाळ्यांचा विरोधातही त्यांनी जबरदस्त लढा दिला होता. प्रस्थापितांनी मनगटाचा वापर करून बळकावलेले व्यापारी गाळे न्यायालयीन लढाई लढून शासनाला मिळवून दिले होते. त्यांच्या लढ्याची दखल घेऊन 16 मे 2016 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बेकायदा व्यापारी गाळे जमीनदोस्त केले होते. आता सार्वजनिक सभागृह खुले करण्यासाठी लढणाऱ्या बशीर जहागीरदार याना प्रशासकीय अनास्थेमुळे आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Anand Paranjpe : मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा
मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
Embed widget