Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मला एन्काउंटर झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केल्याचा दिसतो.
Badlapur Case Accused Akshay Shinde : बदलापुरातील 3 आणि 4 वर्षांच्या दोन मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याने महाराष्टात खळबळ उडाली आहे. अक्षयने पहिल्यांदा स्वत:ला गोळी मारल्याचे समोर आले होते, पण पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ मारल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदेंचा आवाज जागच्या जागी बंद केला का? अशी विचारणा करत प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर अशी विचारणा केली आहे. यांनी या प्रकाराची सीबीआय चौकशीची मागणी नार्को टेस्ट सुद्धा करण्याची मागणी केली आहे.
दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो?
सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मला एन्काउंटर झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केल्याचा दिसतो. हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंस्त्र होता का? त्याची पार्श्वभूमी तशी होती का? जर होती, तर वेगळी काळजी का घेतली नाही? दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? अशी विचारणा त्यांनी केली.
प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर केला?
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, या प्रकरणातील संस्थाचालक आपटे अजूनही फरार का आहे? हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? अक्षय शिंदेचा आवाज जागच्या जागी बंद केला का? प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काउंटर केला? या प्रकरणातील पोलिस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे. पहिल्यापासून या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, लैंगिक शोषणाची घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली होती. आदर्श शाळेतील 23 वर्षीय सफाई कामगार अक्षयने दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरू लागल्या. आई-वडिलांच्या बाबतीत झाले. तेव्हा मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यामधील एका पालकाने दुसऱ्या मुलीला पालकांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केली असता घटना उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी POCSO अन्वये गुन्हा दाखल न करता एफआयआर दाखल केला. नंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या