एक्स्प्लोर

Bacchu Kadu : मी केवळ नावापुरता अध्यक्ष! दिव्यांग कल्याण अभियानावरुन बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत, म्हणाले.... 

Bacchu kadu : मी दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष उरलोय, दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात ते सुद्धा मला कळवले जात नाही, अशी खंत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics मुंबई : सरकारवर मी नाही तर जनता नाराज आहे. सरकार जर आमच्या  मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू  (Bacchu kadu) यांनी सरकारला दिला आहे. मी दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष उरलोय, दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात ते सुद्धा मला कळवले जात नाही, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण काही आमदारांना आपल्या बाप दादांच्या  कमाईचा हा पैसा वाटतोय, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांवरही टीका करत निशाणा साधला आहे.

मी उरलो केवळ वापुरता अध्यक्ष!- बच्चू कडू

दिवांग्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झाल्याचे दिसतय. याचा लोकांना राग का येत नाही? बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची नाव आमच्या वेबसाईटवर मागवली, खोलात जाऊन काम केलं. मात्र, 420 लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आंदोलन करून सुद्धा आणि तुम्ही वारंवार बातमी दाखवून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. 

जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या, एवढंच आमचं काम  

येत्या 21 तारखेला आम्ही पुन्हा एक आंदोलन करणार आहोत, दिव्यांग सचिवालयाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. दिव्यांगांचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वेळीच दखल घेतली पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले. आज मुख्यमंत्री यांनी भेटायला बोलावलं आहे बैठक आहे असं नाही. मात्र त्यात काय तोडगा निघतोय का हे बघू, असेही ते म्हणाले. आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या, एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे देखील आम्हाला कळवलं  जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

....तर निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ!

मी नाराज नाही पण लोक सध्या या सरकारवर नाराज आहे. तुम्ही तुमच्या आईला जर दूध मागितलं तर बाळ नाराज आहे, असं होतं का? तुम्ही लाडकी बहीण आणली पंधराशे रुपये देत आहे, दिव्यांगांचा महिना दीड हजार केला का? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना, विधवा महिलांना का बाजूला ठेवता? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल, तेवढेच मिळणार.  लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही? त्यामुळे सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ, असा असा इशाराही बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. 

स्वत: वर साडेतीनशे केसेस लावून घेण्याची मला गरज नव्हती-  बच्चू कडू 

काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली. घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. मात्र हा पैसा जनतेचा पैसा आहे. हा सगळा सरकारी पैसा आहे. लोकं कर भरतात याचा विसर या लोकांना पडला आहे. यांना वाटतं आपल्या बाप दादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचे आहे. सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो राहणारच. असेही बच्चू कडू म्हणाले. मला एका मोठ्या पक्षात जाता आलं असतं, या अशा केसेस लावून घेण्याची गरज नव्हती.साडेतीनशे केसेस म्हणजे जोक नाही. रक्तात जगून आलेला आहे तो कमी होणार नाही. असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget