एक्स्प्लोर

Maharashtra Rain : राज्यात पावसाची सरासरी घटली, 10 जिल्ह्यात पावसाची तूट; एल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात

Maharashtra Rain : राज्यात पावसाची सरासरी (Average rainfall) घटली आहे. सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. पावसात एका टक्क्याची तूट पडली आहे.

Maharashtra Rain : राज्यात पावसाची सरासरी (Average rainfall) घटली आहे. सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. पावसात एका टक्क्याची तूट पडली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तर 10 जिल्ह्यात पावसाची तूट असून, पाच जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  दरम्यान, राज्यात अल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. सहा ऑगस्टपासून राज्यात मान्सूनने ब्रेक घेतला आहे. 

औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, सातारा, सांगली आणि परभणीसारख्या जिल्ह्यात पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. राज्यात कोकणात सरासरीच्या 118 टक्के पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 88 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 92 टक्के पाऊस तर विदर्भात सरासरीच्या 94 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस ? 

जालना - 52 टक्के - 182.07 मिमी पाऊस 
(11 ऑगस्टपर्यंत जालन्यात 349.06 मिमी सरासरी पाऊस होत असतो) 

सांगली - 62  टक्के - 181.o6 मिमी पाऊस 
(11 ऑगस्टपर्यंत जालन्यात 294.03 मिमी सरासरी पाऊस होत असतो) 

हिंगोलीत - 69 टक्के - 333.08 मिमी पाऊस 
(11 ऑगस्टपर्यंत हिंगोलीत 483मिमी सरासरी पाऊस होत असतो) 

सातारा - 69 टक्के - 397 मिमी पाऊस 
(11 ऑगस्टपर्यंत साताऱ्यात 576.01 मिमी सरासरी पाऊस होत असतो) 

औरंगाबाद - 73 टक्के - 235.5 मिमी 
(11 ऑगस्टपर्यंत औरंगाबादेत 322.4 मिमी सरासरी पाऊस होत असतो) 

अमरावतीत - 73 टक्के - 390.04 मिमी 
(11 ऑगस्टपर्यंत अमरावतीत 531.04 मिमी सरासरी पाऊस होत असतो)

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठ दिवस राज्यात मान्सून कमकुवत आहे. 18 ऑगस्टपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

1 जून ते 11 ऑगस्टपर्यंत पावसाची आकडेवारी


Maharashtra Rain : राज्यात पावसाची सरासरी घटली, 10 जिल्ह्यात पावसाची तूट; एल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात

मागील काही दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अनेक ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायली मिळत आहे. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात कपाशीवर संकट, पाऊस नसल्यानं पिके कोमेजली, शेतकरी चिंतातुर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget