एक्स्प्लोर

Mhada Lottery Update : म्हाडाच्या लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार, सोडतीची वाट बघणाऱ्यांची निराशा

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाकडून काढण्यात येणारी सोडत रद्द करण्यात आली आहे. म्हाडाचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असल्यानं लॉटरी दिवाळीत निघणार नाही, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mhada Lottery Update : दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाकडून (MHADA Pune) काढण्यात येणारी सोडत रद्द करण्यात आली आहे. म्हाडाचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने लॉटरी दिवाळीत निघणार नाही, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लॉटरी रद्द करताना पुणे आणि कोकण विभागातील सोडत एकाच वेळी काढण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या सोडतीबाबत पुढील तारीख अजूनही निश्चित करण्यात आली नाही आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेकांची निराशा झाली आहे.

सॉफ्टवेअर अपडेटमुळे रद्द
मुंबई, पुणे आणि कोकण या तिन्ही विभागाची सोडत रद्द करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सध्या सुरु आहे आणि तेच कारण पुढे करत म्हाडाने अचानक सोडत रद्द केली आहे. राज्यभरातील सर्वसामान्य या सोडतीची वाट बघत होते. अचानक रद्द केल्याचं त्याचं दिवाळीतील घराचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. 

पुणे म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सोडतीने एक नवा विक्रम आता केला आहे. आतापर्यंत 27 हजार सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे म्हाडाने हा मोठा विक्रम केला आहे. येत्या काही दिवसात ही सोडत जाहीर होईल आणि म्हाडामार्फत आता फक्त पुण्यातच नाही तर पिंपरी-चिंचवड, सांगली आणि सोलापूरमध्येही सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 

ऑगस्टमध्ये 5000 घरांची सोडत
यापूर्वी 18 ऑगस्टला पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर (Pune Solapur Kolhapur MHADA Lottery) जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार घरांची लॉटरी निघाली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5,211 घरांसाठी म्हाडाकडून 18 ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीद्वारे 5211 अर्जदार विजेते ठरले होते त्यानंतर पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करुन त्यांना घरांचा ताबा देण्यात आला. सागर खैरनार हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते ठरले होते. या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांचा समावेश होता. यात 20 टक्के योजनेतील 2088, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील 170, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील 2675 आणि म्हाडाच्या विविध योजनेतील 279 घरांचा समावेश होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भाजप नेत्यांमध्येच महामुकाबला; अमित शाह, जेपी नड्डांचं सुद्धा मतदान, पण अखेर बाजी मारली राहुल गांधींनी पाठिबा दिलेल्या उमेदवारानं!
दोन भाजप नेत्यांमध्येच महामुकाबला; अमित शाह, जेपी नड्डांचं सुद्धा मतदान, पण अखेर बाजी मारली राहुल गांधींनी पाठिबा दिलेल्या उमेदवारानं!
Kabutar Khana Dadar: दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले...
दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले...
मैत्रिणीला गोळी मारली, संभाजीनगरचा डॉन 'तेजा'ला अटक, पोलिसांनाच म्हणाला बाहेर आल्यावर अजून चौघींना मारतो.. नेमकं प्रकरण काय?
मैत्रिणीला गोळी मारली, संभाजीनगरचा डॉन 'तेजा'ला अटक, पोलिसांनाच म्हणाला, 'बाहेर आल्यावर अजून चौघींना मारतो.. 'नेमकं प्रकरण काय?
Dadar Kabutar Khana: 'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भाजप नेत्यांमध्येच महामुकाबला; अमित शाह, जेपी नड्डांचं सुद्धा मतदान, पण अखेर बाजी मारली राहुल गांधींनी पाठिबा दिलेल्या उमेदवारानं!
दोन भाजप नेत्यांमध्येच महामुकाबला; अमित शाह, जेपी नड्डांचं सुद्धा मतदान, पण अखेर बाजी मारली राहुल गांधींनी पाठिबा दिलेल्या उमेदवारानं!
Kabutar Khana Dadar: दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले...
दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले...
मैत्रिणीला गोळी मारली, संभाजीनगरचा डॉन 'तेजा'ला अटक, पोलिसांनाच म्हणाला बाहेर आल्यावर अजून चौघींना मारतो.. नेमकं प्रकरण काय?
मैत्रिणीला गोळी मारली, संभाजीनगरचा डॉन 'तेजा'ला अटक, पोलिसांनाच म्हणाला, 'बाहेर आल्यावर अजून चौघींना मारतो.. 'नेमकं प्रकरण काय?
Dadar Kabutar Khana: 'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
John Abraham On Chhaava: 'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
'मी छावा, काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट कधीच करु शकत नाही कारण...' अभिनेता जाॅन अब्राहम नेमकं म्हणाला तरी काय?
Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!
Embed widget