Aurangabad : औरंगाबाद शहरात तब्बल 1601 धार्मिक स्थळं; एकाकडेही भोंग्याची परवानगी नाही
Aurangabad Latest News Update : औरंगाबाद शहरात सर्वधर्मीयांची 1601 धार्मिक स्थळे आहेत. विशेष म्हणजे यातील एकाही धार्मिक स्थळावर परवानगी घेऊन भोंगा बसवण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
Aurangabad Latest News Update : औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा (Bhonga) मुद्दा उपस्थित केल्याने वातावरण तापले आहे. आता पोलिसांकडून सर्वच धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्यात येत आहे. तर पोलिसांकडील नोंदीनुसार औरंगाबाद शहरात सर्वधर्मियांची 1601 धार्मिक स्थळे आहेत. विशेष म्हणजे यातील एकाही धार्मिक स्थळावर परवानगी घेऊन भोंगा बसवण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करण्यात यावे अशी मागणी केली. त्यानंतर पोलिस प्रशासन आणि राज्य सरकार खडबडून जागे झालं. तर पोलिस महासंचालकांनी सर्व शहरे व जिल्हा पोलिसांना धार्मिक स्थळे, त्यांच्यावरील स्पीकर्स, भोंग्यांची संख्या आदींविषयी माहिती गोळा करून पाठवण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार औरंगाबाद शहर पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरात एकूण 1601 धार्मिक स्थळे आहेत. ज्यात मंदिरे 1020, मशीद 417, चर्च 40, बुद्धविहार 120 यांचा समावेश आहे. तर यापैकी एकाही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाकडून भोंग्याची परवानगी घेतलेली नाही.
प्रतिसाद मिळेना....
भोंग्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सर्वच धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्यात येत आहे. यासाठी एक विशेष अर्ज सुद्धा तयार करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
राज ठाकरेंची सभेची तयारी जोरात....
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. तर आज मनसे नेते बाळा नांदगावकर शहरात येणार असून, तयारीच्या आढावाबाबत बैठक घेणार आहे. त्यानंतर ते पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सभेच्या परवानगीबाबत चर्चा करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Aurangabad : मित्राच्या लग्नात तलवार घेऊन बेधुंद डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाला बेड्या
औरंगाबादेत 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?