एक्स्प्लोर
ड्रोन कॅमेऱ्यातून अष्टविनायक दर्शन...

मुंबई: राज्यभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. भाविक बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करुन त्यांची मनोभावे सेवा करत आहेत. सार्वजनिक गणपती मंडळांसह अनेक राज्यातील वेगवेगळ्या गणपती मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याचवेळी अष्टविनायक यात्राही अनेकजण करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन तरुणांनी थेट ड्रोनच्या माध्यमातून अष्टविनायक दर्शन जगाला घडवलं आहे. झॉन मीडिया नावानं एक यूट्यूब चॅनल सुशांत कोयटे आणि श्रीकांत झंवर यांनी सुरु केलं आहेे. या तरुणांनी अष्टविनायक दर्शनासोबतच तेथील निसर्गसौंदर्यही ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे थेट आकाशातून शूट केलेलं अष्टविनायक दर्शन आता भाविकांना घरबसल्याही पाहता येणार आहे. पाहा याचे खास व्हिडिओ मोरगावचा मोरेश्वर पालीचा बल्लाळेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धीविनायक महडचा वरदविनायक लेण्याद्रीचा गिरजात्मक सौजन्य: झॉन मीडिया
आणखी वाचा























