एक्स्प्लोर
अशोक चव्हाण कामंही करतात, पण घोटाळेही : पतंगराव कदम
सांगलीमध्ये स्वर्गीय नेते मदन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

सांगली : ''चव्हाण हे सगळे आमच्या कुंडलीमध्येच आहेत. पण अशोक चव्हाण हे चांगले नेते आहेत. चांगली कामं करतात, पण मध्येच काही तरी घोटाळेही करतात'', अशी कोपरखळी काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मारली.
सांगलीमध्ये स्वर्गीय नेते मदन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांसह अशोक चव्हाण, माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम आणि जिल्ह्यातील जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, ''पतंगराव कदम यांची ही बोलण्याची शैली आहे. त्यामुळे त्यांचं मनावर घ्यायचं नाही. त्यांच्या मनात काहीही नसतं'', असं म्हणत अशोक चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला.
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























