एक्स्प्लोर

स्थलांतरित पक्षांच्या मुक्तविहाराने तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलाव झाले नंदनवन; मे महिन्यातही पक्षांचा चिवचिवाट

गोंदिया जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलाव सध्या स्थलांतरित पक्षांचे नंदनवन झाला आहे. मे महिन्यातही या ठिकाणी पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळत आहे.

गोंदिया : हिवाळ्याला सुरुवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडी बरोबरच अनेक विदेशी पक्षी आपल्या भागात यायला सुरुवात करतात. आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात होते. हे विदेशी पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, मे महिना लोटूनही हे विदेशी स्थलांतरित पक्षी अद्यापही जैव विविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलावात मुक्तविहार करताना आढळून येत आहे. हा तलाव या स्थलांतरित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच बनला आहे.

स्थलांतरित पक्षांच्या मुक्तविहाराने तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलाव झाले नंदनवन; मे महिन्यातही पक्षांचा चिवचिवाट

भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आसलपाणी तलावावर हे विदेशी पक्षी मोठा चिवचिवाट करून मुक्तविहार करीत असल्याचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. जंगलाच्या अगदी मधोमध असलेला हा तलाव निर्मनुष्य असतो. या तलावात रखरखत्या उन्हाळ्यातही पाण्याची मुबलकता आणि विदेशी पक्षांना या तलावात मिळणारे खाद्य, यामुळे या पक्षांचे मे महिन्यातही तलावात वास्तव्य असते. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हे मुळात जैवविविधतेने नटलेले जंगल म्हणून जिल्ह्यात त्याची ओळख आहे. अशा या जैवविविधतेने नटलेल्या जंगलातील नयनरम्य तलावात मागील अनेक वर्षांपासून स्थलांतरित पक्षी येतात. आसलपाणी तलावाची विशेषता म्हणजे, तलावाचे शुद्ध पाणी व चारही बाजूने गवत, खुरटी झुडपे, कमळ, पणाळीली व अन्य वनस्पतीने वेढलेला तलाव परिसर. हे पक्षी मंगोलिया या देशातून आले असून त्यामध्ये  लिटिल ग्रेप्स, कॉटन पिग्मी डक्स, विसलिंग डक्स, ग्रे हेरोन, पर्पल हेरोन, पर्पल स्वॅप हेन, कॉमन कूट, वॉटर कॉफ हे स्थलांतरित पक्षी तलावात मनमुराद मुक्तविहार करताना दिसून येत आहे.

स्थलांतरित पक्षांच्या मुक्तविहाराने तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलाव झाले नंदनवन; मे महिन्यातही पक्षांचा चिवचिवाट

थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात या स्थलांतरित पक्ष्यांचे येथे आगमन होते. हिवाळ्याच्या दिवसात येथे मुक्तविहार केल्यानंतर हे स्थलांतरित पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, यावर्षी या पक्षांचा उन्हाळ्याच्या दिवसातही या नयनरम्य परिसरातील तलावातील आल्हाददायक वातावरण असलेल्या आसलपाणी तलावातील मुक्काम अद्याप संपलेला नाही. त्यामुळे या तलावातील आणि जंगलातील जैवविविधता त्यांच्यासाठी आकर्षण ठरले असून हा परिसर आवडल्याने जणू त्यांनी येथेच मुक्काम ठोकला अशी प्रचिती येत आहे. निर्मनुष्य असलेल्या जंगलातील या नयनरम्य तलाव परिसरात पोहोचल्यावर स्थलांतरित पक्षांचा चिवचिवाट कानाला सुखद अनुभव देतो. तलावातील त्यांचा मुक्तविहार बघितल्यावर डोळ्याचे पारणे फेडतो.

स्थलांतरित पक्षांच्या मुक्तविहाराने तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलाव झाले नंदनवन; मे महिन्यातही पक्षांचा चिवचिवाट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget