एक्स्प्लोर
मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंट एकबोटे गायब आहेत.
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंट एकबोटे गायब आहेत. त्यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानेही नकार दिला होता. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
एक जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.
संबंधित बातम्या :
दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा
मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
मिलिंद एकबोटेंच्या शोधात पोलिसांचा हलगर्जीपणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement