अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला गोव्यात अटक, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई
Drug Case: अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिचा भाऊ अॅगिसियालोस डेमेट्रिएड्स याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी गोव्यातून ताब्यात घेतले आहे.
Drug Case: अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिचा भाऊ अॅगिसियालोस डेमेट्रिएड्स याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी गोव्यातून ताब्यात घेतले आहे. एनसीबीने अगिसिलाओस डेमेट्रिएड्स विरुद्ध PITNDPS (अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांमधील अवैध वाहतूक प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अॅगिसियालोस डेमेट्रिएड्स हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.
गेल्या वर्षीही जारी करण्यात आला होता आदेश
अॅगिसियालोस डेमेट्रिएड्स विरुद्ध एनसीबीने गेल्या वर्षी 21 सप्टेंबर रोजी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (PITNDPS) कायद्यांतर्गत आदेश जारी केला होता. त्यानंतर डेमेट्रिएड्सने या वर्षी 28 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या आदेशाला गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले होते, परंतु त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार
अॅगिसियालोस याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर कोठडीच्या आदेशानुसार डेमेट्रिएड्स याला मुंबई पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अॅगिसियालोसला मुंबईत आणल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले जाईल.
हे देखील वाचा-
- Amit Shah: देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर डेटाबेस करण्याचं काम सुरु: अमित शाह
- Bulldozer History: घर पाडण्यासाठी नव्हे तर वेगळ्याच कामासाठी बुलडोझऱचा शोध; जाणून घ्या इतिहास
- National Civil Service Day 2022: आज राष्ट्रीय लोक सेवा दिवस! इतिहास आणि इतर महत्वाची माहिती घ्या जाणून
- Nashik MHADA : नाशिकमध्ये म्हाडाची लॉटरी; कधी आणि किती घरांसाठी? मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून महत्वाची माहिती
- Raju Shetti : ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेतले त्यांच्यासोबत कसे जाणार, राजू शेट्टींचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा
- Dadaji Bhuse : कृषीमंत्र्यांनी गाड्याचा ताफा थांबवत शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतमाल स्वतः च विकण्याचं केलं आवाहन