(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Shah: देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर डेटाबेस करण्याचं काम सुरु: अमित शाह
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुरुवारी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुरुवारी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकार देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. ज्यामध्ये बॉम्ब स्फोट, दहशतवादासाठी फंडिंग, बनावट चलन, अंमली पदार्थ, हवाला, शस्त्रास्त्रांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश असेल. हा डेटाबेस केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिसांना वेगवेगळ्यां तपासकार्यात मदत करण्यासाठी महत्वाचा असणार आहे, असं शाह म्हणाले.
एनआयएच्या 13 व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह म्हणाले की, "दहशतवाद हा मानवी हक्क उल्लंघनाचा सर्वात मोठा प्रकार आहे. लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ते मुळापासून नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. , जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यांमुळं तेथील दहशतवादाला आळा घालण्यात मोठी मदत झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी धोरण आखत आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.
"केंद्र सरकार देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. ज्यामध्ये बॉम्बस्फोट, दहशतवादी निधी, बनावट चलन, अंमली पदार्थ, हवाला, शस्त्रांची तस्करी आणि दहशतवाद यांचा समावेश आहे. या डेटाबेसमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील केंद्रीय संस्था आणि पोलिसांना तपासात मदत होईल. एनआयए, केंद्रीय दहशतवादविरोधी तपास संस्था, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड आणि इंटेलिजन्स ब्युरो यावर काम करत आहे", असंही अमित शाह यांनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Nashik MHADA : नाशिकमध्ये म्हाडाची लॉटरी; कधी आणि किती घरांसाठी? मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून महत्वाची माहिती
- Raju Shetti : ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेतले त्यांच्यासोबत कसे जाणार, राजू शेट्टींचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा
- Dadaji Bhuse : कृषीमंत्र्यांनी गाड्याचा ताफा थांबवत शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतमाल स्वतः च विकण्याचं केलं आवाहन