एक्स्प्लोर
Advertisement
कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील
कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि दोषींच्या तिन्ही वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली आहे. 29 नोव्हेंबरला दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि दोषींच्या तिन्ही वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली आहे. 29 नोव्हेंबरला दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
अॅड. योहान मकासरे (आरोपी क्रमांक 1 – जितेंद्र शिंदेचे वकील) :
“मी सरकारकडूनही आरोपी नंबर एकचं काम पाहतोय, आणि फाशी न देता जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली आहे. आरोपी म्हणत होता, मी मारलं नाही. पण आज सुनावणी यासंदर्भात नव्हतीच. फाशी की जन्मठेप, हे सांगायचं होतं. आम्ही जन्मठेपेची मागणी केली आहे.”अॅड. बाळासाहेब खोपडे (आरोपी क्रमांक 2 – संतोष भवाळचे वकील) :
"घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजिक दबाव नसावा. संतोष भवाळनं गुन्हा केलेला नाही, तरीही पुरावा आणून आरोपी दोषी ठरवला गेला. शिवाय घटनेवेळी 2 आणि 3 क्रमांकाच्या आरोपींना कुणीही घटनास्थळावरुन पळून जाताना पाहिलेलं नाही. म्हणून संतोष भवाळवर 302 कलमाची शिक्षा लागू होत नाही. या प्रकरणी रेअरेस्ट ऑफ रेअर असं यात काय घडलं? दिसला फिरला म्हणून कट करुन हत्या असं होत नाही. शिक्षा दिली तर समाजात ऐकोपा होईल का, तसं असेल तर मी फाशी मागेन. फाशीसाठी पुरावा नाही."अॅड. प्रकाश आहेर (आरोपी क्रमांक 3 – नितीन भैलुमेचे वकील) :
“आरोपी नंबर 3 म्हणजेच नितीन गोपीनाथ भैलुमेचा मी वकील असल्या कारणाने, मी आज न्यायालयासमोर त्याच्यावतीने जी बाजू मांडली. विशेषत: त्याच्याविरोधात जी कलमं लावण्यात आलेली आहेत. ते ‘120-ब’ म्हणजे कटकारस्थान आणि ‘109’ म्हणजे गुन्ह्याला उत्तेजित करणं, या दोन कलमांखाली आरोपी तीनला दोषी ठरवण्यात आले आहे. जे काही कोर्टासमोर आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी क्रमांक तीन याच्याविरोधात कुठलाही साक्षीदार नाही किंवा प्रत्यक्षदर्शी नाही. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारलेला आहे. नितीन भैलुमे कॉलेजचा विद्यार्थी असून, बीएसस्सीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो आहे आणि त्याचे आई वडील गरीब आहेत. दलित कुटुंबातून येऊन इतकं शिक्षण घेतलं. नितीनच्या पुढील अभ्यासासाठी न्यायालयाने जेलमध्ये पुस्तकेही पुरवली होती. त्याची आई आजारी असते. तिचं ऑपरेशन झालेलं आहे. वडील मजुरी करतात. या गुन्ह्यात अडकवल्यामुळे आणि त्याला 120 ब आणि 109 मध्ये दोषी असून, 302 म्हणजे गुन्ह्यामध्ये कुठलाही संबंध नाही, बलात्कारामध्ये त्याचा कुठलाही संबंध नाही. त्याच्याविरोधात कुठलाही मेडिकल पुरावा नाही. दाताच्या सॅम्पलमध्येही त्याच्याविरोधात रिपोर्ट आलेले नाहीत.”अॅड. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद :
- 11 जुलैला आरोपींनी पीडितेला अडवलं. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली. यावेळी आरोपी भवाळ आणि नितीन भैलुमे हसत होते. निशस्त्र मुलीला हसून ओढतात. त्यामुळं शिंदेच्या कृतीचा भवाळ आणि नितीन भैलुमे आनंद घेत होते.
- नागरिक येण्याच्या भितीनं दोघांनी आपलं काम तिला नंतर दाखवू, असं शिंदेला म्हटलं. म्हणजेच आपण दोघे नंतर अत्याचार करु हा अर्थ होतो.
- त्यानंतर पीडित तरुणी दोन दिवसांनी 13 जुलैला सायंकाळी आजोबाकडे दुचाकीवरुन जात होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन लक्ष ठेवत होते.
- घराबाहेर गेलेली मुलगी घरी लवकर न आल्यानं आई पाहायला निघाली. त्यावेळी पीडित विवस्त्र पडली होती आणि त्यावेळी शिंदे पळून गेला. यापूर्वी भवाळ आणि नितीन भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.
- तिन्ही आरोपी मनोरुग्ण नव्हते. आरोपी प्रौढ होते. त्यांना कृत्याची जाणीव होती. त्यामुळे आरोपींना कमी शिक्षा दिल्यास समाजात, ते पुन्हा असं करणार नाही, याची खात्री नाही. तिन्ही आरोपींना क्रूरपणे आत्याचार आणि हत्या केली. ही विकृती आहे. त्यामुळे तिघांनाही फाशी द्यावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement