एक्स्प्लोर
अण्णांचा वाढदिवस शाळकरी चिमुकल्यांसोबत
राळेगणसिद्धीः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. तसंच आज शाळेचाही पहिला दिवस आहे. यानिमित्ताने अण्णांनी राळेगणमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं अण्णांनी स्वागत केलं. विद्यार्थ्यांनीही अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शाळेत त्यांचा वाढदिवस साजरा केला. अण्णांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यामुळं विद्यार्थ्यांचा उत्साह चांगलाच वाढला होता.
यावेळी अण्णांनी शिक्षकांचीही शाळा घेतली. शिक्षकांनी केवळ घड्याळाकडे पाहून काम करु नये, असं सांगत अण्णांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांना मोलाचा सल्ला दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement