एक्स्प्लोर

अजित पवार अन् माझा 36 चा आकडा, तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भेटणार; दमानिया पुरावे देणार

अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे. तरीही मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मी त्यांना भेटणार आणि पुरावे देणार असल्याचे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं.

Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) आणि माझा 36 चा आकडा आहे. तरीही मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मी त्यांना भेटणार आणि पुरावे देणार असल्याचे वक्तव्य अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली असल्याचीही माहितीही दमानिया यांनी दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. 

भ्रष्टाचाराविरुद्ध मरेपर्यंत लढत राहणार

अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन. पण बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? असा सवाल देखील दमानिया यांनी केला आहे.  

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यवहार एकत्र

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत. त्यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत. धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे महाजनकोशी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली असल्याचे दमानिया म्हणाल्या. हे Office of Profit आहे. त्यामुळं मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे  असे दमानिया म्हणाल्या. तसेच बघू अजित पवार कधी वेळ देतात असेही त्या म्हणाल्या.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती हत्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. तसेच राज्यातील विविध ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे देखील निघाले होते. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती वाल्मिक कराड हेच सुत्रधान असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असी मागणी केली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Anjali Damania : देशमुखांचं पोस्टमॉर्टम केलं, अंबाजोगाईत पियुष हॉटेल, वाल्मिकसाठी नाशिकहून बीडला आणलं? अंजली दमानियांनी सिव्हिल सर्जनची कुंडली मांडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Embed widget