एक्स्प्लोर

Amravati Corona Guidelines| लग्नसमारंभात उपस्थितांची संख्या अधिक असल्यास वधू- वर पक्षावरही फौजदारी गुन्हा

कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा वेग पकडल्यामुळं आता जिल्ह्यात पुन्हा अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीच यासंदर्भातील आदेश दिले

अमरावती : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (CoronaVirus) रुग्णांचा आकडा अतिश वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागांपासून ते अगदी शहरी भागांपर्यंत रुग्णसंख्येचा हा आलेख उंचावताना दिसत आहे. याच परिस्थितीमध्ये आता प्रशासनही सतर्क झालं असून, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मागील काही महिन्यांमध्ये कोरोनासंदर्भातील अनेक नियमांत शिथिलता दिल्यानंतर आता चित्र आणखी भयावह होत असल्याचं पाहून राज्यातील अमरावती जिल्ह्या प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद अमरावतीमध्ये करण्यात आली. बुधवारी इथं, दिवसभरात तब्बल 498 कोरोना रुग्ण आढळले, तर, 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 26 हजार 726वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा वेग पकडल्यामुळं आता जिल्ह्यात पुन्हा अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास याची शिक्षा म्हणून वाहतुकदाराला पाच हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येणार आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचं पालन न करणाऱ्या दुकानांना १० हजार दंड ठोठावण्यात येणार असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याचीही नोंद करण्यात येणार आहे. TOP 50 | मास्क न लावणाऱ्यांकडून 30 कोटी वसून | बातम्यांचं अर्धशतक | 17 फेब्रुवारी 2021 हॉटेल,रेस्टॉरंटची वेळ यापुढं रात्री  10 वाजेपर्यंतच मर्यादित असणार आहे. शिवाय हॉटेल, रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांवर ५० टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास २५ हजार दंड ठोठावण्यात येणार असून १०  दिवस हॉटेलला सील करण्यात येणार आहे. लग्नसोहळ्यांवरही निर्बंध कोरोना काळात सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यावेळी अनेक समारंभ, विवाहसोहळ्यांचे बेत पुढे ढकल्यात आले, काही समारंभांच्या तारखा बदलल्या तर, काही रद्द झाले. पण, नियमांनमध्ये शिथिलता येताच पुन्हा एकदा या समारंभांना वेग मिळाला. यामध्ये अनेकदा मर्यादित आकडयापेक्षा जास्त उपस्थितांची संख्या कोरोना संसर्गाची भीती आणखी वाढवून गेली. सातत्यानं नियमांच्या अंमलबजावणीचे निर्देश देऊनही चित्र न बदलल्यामुळं आता अमरावतीमध्ये याबाबतही सक्तीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत लग्नासोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला ५० हजार दंड ठोठावण्यात येणार असून, १० दिवस हॉलला सील करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. शिवाय वधू- वर पक्षावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळं किमान आतातरी कोरोना संसर्गाकडे सर्वांनी गांभीर्यानं पाहावं, असंच आवाहन सध्या सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget