Suresh Dhas on Dhananjay Munde: काश्मीरमधील लोकांचाही पीक विमा, प्रत्येक जिल्ह्यात घोटाळा, तत्कालीन कृषिमंत्री आणि त्यांचा अका काहीही करू शकतो; सुरेश धसांचा गंभीर आरोप
Suresh Dhas on Dhananjay Munde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas on Dhananjay Munde: एक रुपयात पिक विमा योजनेतून झालेल्या भ्रष्टाचारावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी माजी कृषीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका केली आहे. सुरेश धस यांनी काश्मीरमधील लोकांचा सुद्धा पीक विमा काढण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस म्हणाले की, यांनी वन जमिनी, सरकारी जमिनीवर पिके विमा उतरवला आहे. हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यातील लोकांच्या नावे परळीमधे पिके विमा काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मात्र धाराशिवमधे या प्रकरणची चौकशी बंद करण्यात आली आहे. ही चौकशी कशी बंद केली? अशी विचारणा सुरेश धस यांनी केली. ते पुढे म्हणाले की, तत्कालीन कृषिमंत्री आणि त्यांचा अका काहीही करू शकतो. त्यांनी काश्मीरमधील लोकांचे देखील पिक विमे ते काढू शकतात.
प्रत्येक जिल्ह्यात पिक विमा घोटाळा
त्यांनी पुढे सांगितले की, धाराशिवचा विचार केला तर अडीच कोटी रुपये बिड जिल्ह्यात 17 कोटी रुपये असा प्रत्येक जिल्ह्यात पिक विमा घोटाळा आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, पाऊस, दुष्काळ, गारपीट, पूर, कीड-रोग आदी कारणांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एक रुपयात ‘पीक विमा योजना’ राबवण्यात आली. पीक विमा म्हणजे पिकांच्या नुकसानभरपाईसाठी दिला जाणारा विमा. शेतकरी ठराविक हप्ता भरून (उदा. रु. 1, रु. 2, किंवा प्रतिहेक्टरी काही टक्केवारी) विमा घेतो. पिकाचे नुकसान झाल्यास त्या नुकसानाची भरपाई विमा कंपनीकडून शेतकऱ्याला दिली जाते. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा सातत्याने आरोप होत आहे. सुरेश धस यांच्याकडून सातत्याने पीक विम्यात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























