एक्स्प्लोर

Neelam Gorhe on Thackeray: ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख

Neelam Gorhe on Thackeray: नीलम गोऱ्हे यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना ठाकरे ब्रँडवरून सडकून टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.

Neelam Gorhe on Thackeray: राज्यात हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी महायुती सरकारला दोन्ही जीआर रद्द करण्यास भाग पडल्यानंतर त्याचा विजयी मोळ मेळावा उद्या (5 जुलै) मुंबईमध्ये होत आहे. या मेळाव्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता असून शिवसेना आणि मनसेकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू मराठीवरून कोणता संदेश देणार आणि भविष्यात एकत्र येणार का? याची सुद्धा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्येच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा उत्सुकता वाढवणारा आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड कधी संपला जाणार नाही हे सुद्धा ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी सूचित केलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली आहे. 

ब्रँड हा बाजारातील उत्पादनाला वापरतो

नीलम गोऱ्हे यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना ठाकरे ब्रँडवरून सडकून टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की लोकशाहीमध्ये मेळावे घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज्य सरकारने जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसेच समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती काय करणार हे विचारात न घेता विरोध करून चुकीच असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. मराठी जणांना लक्षात घेऊन मेळा होत आहे असं मी गृहीत धरते असे त्या म्हणाल्या.  ब्रँड हा बाजारातील उत्पादनाला वापरतो, काही प्रश्नांची उत्तरं काळ देईल असंही त्या म्हणाल्या.  त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभेमध्ये साठ आमदार निवडून आणून शिंदे साहेबांनी आपली प्रतिमा वंचावली. 

काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही 

काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही असं म्हणणारे आहेत. मात्र ठाम भूमिकेने त्यांच्यासाठी संघर्ष करावा. काही फुटकळ लोकांची दखल घेतली पाहिजे हे काही गरजेच नसल्याचे म्हणत त्यांनी संदेश देशपांडे यांच्यावर खोचक टीका केली. दरम्यान मराठीवर बोलताना त्या म्हणाल्या की मराठी देशाचे नेतृत्व केलं आहे. दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये मराठी व्यावसायिकांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चाला भाजपकडूनच रसद पुरवण्यात आली आहे अशी टीका मनसे नेते अविनाश  जाधव यांनी केली आहे. या टीकेवर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की मीरा भाईंदरमध्ये रसद पुरवण्याचे काम कोण करत आहे पहिल्यांदा पहिले पाहिजे. राजकारण आपल्या भल्याचं नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Case : माझ्या मुलीनं जीवन संपवलं नाही, तिची हत्याच!; वडिलांचा गंभीर आरोप
Suresh Dhas : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी राजकारण नको, SIT चौकशी करा; धस यांची मागणी
Maharashtra Superfast News : 28 OCT 2025 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
NEOM Sky Stadium: सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले 'स्काय स्टेडियम', जमिनीपासून 350 मीटर उंचीवर!
8th Pay Commission : केंद्राचा मोठा निर्णय, आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Amazon Layoffs :  आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
Embed widget