![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
SSC Result 2022 : यंदा राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. निकालात कोकण विभाग अव्वल ठरला तर यंदाही मुलींनी बाजी मारली. जाणून घेऊया दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये..
![SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये SSC Result 2022 :maharashtra board 10th ssc result 2022 date time ssc result 2022 declared 96.94 percent student pass ssc results mahresult nic in and MH10.ABPMajha.Com SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/e7f44ad8b9d1aa5af36fff98d415b7e9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 94.40 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण - 99.27 टक्के
पुणे - 96.96 टक्के
कोल्हापूर - 98.50 टक्के
अमरावती - 96.81 टक्के
नागपूर - 97 टक्के
लातूर - 97.27 टक्के
मुंबई - 96.94 टक्के
नाशिक - 95.90 टक्के
औरंगाबाद - 96.33 टक्के
निकालात मुलींची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.90 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
95.24 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेत राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 94.40 टक्के आहे.
दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
* यावर्षीची दहावीचा निकाल- 96.94 टक्के
* नऊ विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के
* यावर्षी 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांकडून दहावीची परीक्षा देण्यात आली. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
* यावर्षी पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 79.06 टक्के, मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 1.90 टक्क्यांनी जास्त
* या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.40 टक्के
* या परीक्षेतील 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागलाय.
* या परीक्षेत 6 लाख पन्नास हजार 779 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 58 हजार 027 द्वितीय श्रेणीत तर 42 हजार 170 मुलं उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
* राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
* मार्च 2020 च्या तुलनेत यावर्षी निकाल 1.64 टक्के जास्त लागला आहे. 2020 मध्ये 95.30 टक्के होता यावेळेस तो 96.94 टक्के आहे. (मागील वर्षी परिक्षा न होता अंतर्गत मूल्यमापन करुन गुण देण्यात आले होते.)
या परीक्षेत विभागीय मंडळांमधून 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
पुणे : 5
औरंगाबाद : 18
मुंबई : 1
कोल्हापूर : 18
अमरावती : 8
नाशिक : 1
लातूर : 70
कोकण : 1
अशा 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले.
या परीक्षेत राज्यातील 29 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
*कला, क्रीडा, एनसीसी आणि स्काऊट-गाईडमधे सहभाग नोंदवणाऱ्या आणि प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामळे स्पर्धा न झाल्याने या विद्यार्थ्यांनी ते सातवी आणि आठवीत असताना दाखवलेल्या प्राविण्यानुसार दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारुन अधिकचे गुण मिळवण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना लागोपाठ दोनवेळा होणाऱ्या म्हणजे जुलै-ऑगस्ट 2022 आणि मार्च 2023 ला होणाऱ्या परीक्षेच्या वेळी पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
एक लाख 64 हजार 798 विद्यार्थ्यांना यंदा सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
जे सहा अनिवार्य विषय आहेत त्या सहापैकी पाच विषयांमधील सर्वोत्तम गुण निवडून त्यांची टक्केवारी गुणपत्रिकेत नोंदवण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना 20 जुन ते 29 जुन या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी पन्नास रुपये भरावे लागतील तर त्याच्या झेरॉक्स कॉपी मागवण्यासाठी प्रतिविषय 400 रुपये मोजावे लागतील.
ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी मिळाल्यावर पुढील पाच दिवसांत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये मोजावे लागणार आहेत.
निकालाबाबत आक्षेप असल्यास काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?
स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)