एक्स्प्लोर

Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 

Toss The Coin कंपनीचा शेअर भांडवली बाजारात 17 डिसेंबरला लिस्ट झाला होता. याचा किंमतपट्टा 182 रुपये होता. आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला होता. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओला दमदार परतावा दिला. टॉस द कॉइन कंपनीनं एसएमई आयपीओ आणला होता. या कंपनीचा आयपीओ 17 डिसेंबरला लिस्ट झाला होता. कंपनीनं या आयपीओचा किंमतपट्टा 182 रुपये निश्चित केला होता. हा आयपीओ 90 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. लिस्ट होताच शेअर 363 रुपयांवर पोहोचलेला म्हणजेच पहिल्या दिवशी 99 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला होता.  

शेअर बाजारात टॉस द कॉइन कंपनीच्या आयपीओची जोरदार चर्चा आहे. हा आयपीओ लिस्ट झाल्यापासून सलगपणे अप्पर सर्किट लागत आहे.17  डिसेंबरला आयपीओ लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये आता 100 रुपयांची वाढ झाली असून काल बाजार बंद झाला तेव्हा शेअर 463 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसात 100 रुपयांची वाढ झाली आहे.  

504,000 शेअर जारी  

Toss The Coin नं IPO आयपीओद्वारे 504000 शेअर जारी केले होते. या आयपीओचा किंमतपट्टा 172-182 रुपयांदरम्यान होता. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 600 शेअर होते. कंपनीनं 9 डिसेंबरला अँकर गुंतवणूकदारांकडून 2.60 कोटी रुपये जमवले होते. टॉस द कॉइन ही कंपनी चेन्नईतील मार्केटिंग कन्सल्टिंग कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2020 मध्ये झाली होती. ही कंपनी मार्केटिंग सेवा पुरवते. ही कंपनी बी2बी टेक कंपन्यांसाठी ब्रँडिंग,  कंटेंट डेव्हलपमेंट, वेबसाइट डिजाइन, सोशल मिडिया कॅम्पेन आणि गो टू मार्केट रणनीती तयार करते. 

शेअर बाजारात पाच मेनबोर्ड आयपीओ वेटिंगवर

भारतीय शेअर बाजारात 27 डिसेंबरला मेनबोर्ड आयपीओ लिस्ट होणार आहेत.ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्सचे आयपीओ 27 डिसेंबरला लिस्ट होतील. या आयपीओवर गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पाडला आहे.  हे सर्व आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे. जीएमपीनुसार या आयपीओसाठी बोली लावणाऱ्यांना गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. ममता मशिनरी, ट्रान्सरेल लायटिंग आणि डीएएम कॅपिटलचे आयपीओ जीएमपीनुसार लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना चांगले पैसे मिळतील. 

इतर बातम्या : 

IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kazakhstan Plane Crash:तांत्रिक बिघाड,विमानतळावर घिरट्या...कझाकिस्तानमधील विमान अपघाताचा पूर्ण VIDEOMantralay New Furniture : तिजोरीत खडखडाट, मंत्र्यांच्या दालनांच्या डागडूजीवर खर्चांचा भडिमारTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या, आरोपीला शेगावमधून अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
Embed widget