Sharad Pawar on Rohit Pawar ED Notice : "ईडी संघर्ष यात्रा" सुरु होणार; आमदार रोहित पवारांना ईडी नोटीस धडकताच शरद पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे.
मुंबई : कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. इडीकडून 5 जानेवारी रोजी बारामती, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही ठिकाणी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो या कंपनीच्या आवारात आणि काही संबंधित संस्थांवर छापे टाकले होते. त्यानंतर आता चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. 38 वर्षीय रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि ते बारामती अॅग्रोचे मालक आणि सीईओ आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात आहेत.
रोहित पवार हे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑगस्ट 2019 च्या एफआयआरमधून समोर आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात त्यांनी संघर्ष यात्रा सुद्धा काढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना ईडीची नोटीस येऊन धडकली आहे.
रोहित पवारांना ईडीची नोटीस, शरद पवार काय म्हणाले?
रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, यापूर्वी सुद्धा रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस आली आहे. तत्पूर्वी, बोलताना त्यांनी विरोधकांवर ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीच्या फेऱ्यांवर भाजपवर तोफ डागली होती. ते म्हणाले की, आज केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, पण चौकशा लावल्या जातात. त्यांचे मंत्री आज तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात टाकल्याचे ते म्हणाले. अयोध्येत 7 हजार कोटी खर्च केला जात आहे. एकाबाजूला दुष्काळाग्रस्तांना मदत दिली जात नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामाच्या नावाचा वापर केला जाईल. सध्याचे राज्यकर्ते देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असून सत्तेचा गैरवापर करत आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या