एक्स्प्लोर

Sanjay Raut : नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांचे एकत्रित प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये नितीन गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  

Sanjay Raut : नागपूरमध्ये (Nagpur Loksabha) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये नितीन गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  

गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.

महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली 

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले, ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीकाABP Majha Headlines :  11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावंTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला अटक; कर्नाटकात सापडला
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
Embed widget