Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा....रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल
Raigad Viral Video : दुर्गराज रायगडवरच्या मुसळधार पावसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
Raigad Viral Video : रायगडचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त किल्लाच नव्हे तर मराठ्यांचा स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा... रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज. धुवांधार जलवर्षावात तर हा देखणा दुर्गराज पाहणे म्हणजे डोळ्याचे निव्वळ पारणे फेडण्याचा क्षण. असाच एक रायगडवरच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रायगडवरचा पाऊस अनुभवने म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या सरी...रायगडवरचा पाऊस म्हणजे अगदी फुटावरचेही काही दिसत नाही. रायगडवरचा पाऊस स्वतः गेल्याशिवाय कळत नाही, अनुभवता येत नाही. या गोष्टीचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये रायगडवरच्या राजसदरेवर पडणारा पाऊस कॅमेरात कैद करण्यात आला आहे. त्यामध्ये मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा हा तर अगदीच मोहक दिसतोय. आता हा व्हिडीओ नेमका कोणी काढला हे अद्याप समोर आलं नाही. पण हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
राष्ट्रपती रायगडला भेट देणार
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
महत्त्वाच्या बातम्या :
- President Ram Nath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रायगडाला भेट देणार, संभाजीराजेंचं ट्वीट; तारीखही ठरली
- Viral Video : नवरा-नवरीचा स्वॅग भारी; JCBच्या बकेटमध्ये बसून मांडवात एन्ट्री, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं
- Viral Video : 'गार्लिक म्हणजे आलं', पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांची अजब 'माहिती'; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल