President Ram Nath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रायगडाला भेट देणार, संभाजीराजेंचं ट्वीट; तारीखही ठरली
President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे.
President Ramnath Kovind Raigad Visit : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचं खासदार संभाजीराजेंनी नमूद केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :