(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरक्षणाचा फॉर्म्यूला आमच्याकडे आहे, मात्र जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही तो कोणाला देणार नाही: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar : आरक्षण कसे द्यायचे याचा फॉर्म्यूला आमच्याकडे आहे. परंतू जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही हा फार्मूला कोणालाही देणार नाही. अस वक्तव्य ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
Washim News वाशिम : आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढत आहे. या यात्रे दरम्यान ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. आरक्षण हे सुरक्षित असलं पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची मागणी यापूर्वीच मान्य झाली आहे. असे असताना ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. त्यांना आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फॉर्म्यूला आमच्याकडे आहे. परंतू जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही हा फॉर्म्यूला कोणालाही देणार नाही. अस वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते वाशिम (Washim News) जिल्ह्यातील पोहरादेवी इथं आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
युती जुडेल का हे आर्थोपेडिक डॉक्टरलाच विचारावं लागेल- प्रकाश आंबेडकर
भाजप आणि शिवसेना हे जरी बहुजन समाजाचे राजकारण करत असले तरी असं करत असल्याचे त्यांनी कधी दाखवलं नाही. ते बहुजनांशी जुळले असं दाखवलं नसल्याने इफेक्टिव्ह असलेल्या पार्टीला आम्ही आमंत्रित केलंय. लोकसभा निवडणुकामध्ये वंचित आणि शिवसेना यांची युती संपुष्टात आली. मात्र, विधानसभा निवडणूक दरम्यान ही युती अबाधित राहील का? या प्रश्नावर उत्तर देताना, एकदा युती तुटलेली ती जुळत नसते, असं उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले. तर पुन्हा युती चे चान्स आहेत का, या बाबत विचारले असता मिश्किल उत्तर देत आर्थोपेडिक डॉक्टरला विचारावं लागेल असे उत्तर आंबेडकर यांनी दिले.
कुणबी मराठा आमदार धनगर, माळ्यांसोबत नाही
"कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे, त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या