एक्स्प्लोर

मनोज जरांगेंची विधानसभेपूर्वी मोर्चेबांधणीला सुरुवात, नारायण राणेंसह राम कदमांवर निशाणा, म्हणाले...

आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत त्यांनी नारायण राणेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.

Manoj Jarange: राज्यातील मराठा आरक्षण प्रश्न आता चांगलाच तापला असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा असं म्हणत सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायचं असा आवाहन त्यांनी केलंय. दरम्यान राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारलेलं दिसतंय. दरम्यान प्रकाश आंबेडकरांना मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे असं ते म्हणालेत. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. 

कागदपत्र काढून ठेवा 

मनोज जरांगे यांनी आता मराठा समाजाला विधानसभेच्या उमेदवारीसाठी कागदपत्र काढून ठेवायला सांगितलंय. मराठा समाजांनी सज्ज राहिला पाहिजे असं म्हणत जो उमेदवार उभा राहील त्याच्या मागेच सगळ्यांनी उभं राहायचं. जे मराठा उमेदवार आजपासून तयारी करणार आहेत तुम्ही कागदपत्र जरी काढले तरी कोणाचंही नाव येऊ शकतं याची तयारी ठेवा. एकदा जर एक उमेदवार ठरला तर आपले कागदपत्र काढलेले वाया गेले तरी चालतील.

नारायण राणेंवर मनोज जरांगे म्हणाले..

मराठवाड्यात जाऊन एकदा बघतोच मनोज जरांगे काय करतात असं नारायण राणेंनी म्हटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मी दादांना म्हटलंच नाही मराठवाड्यात यायचं नाही. तुम्ही काय बघून घेणार. मी जर समजा म्हणलोच तर तुमचं कोकणात जाणं ही अवघड होईल असं मनोज जरांगे म्हणाले. मी बघायला लागलो तर फजिती होईल. नारायण राणे यांना मी मानतो. मी मराठवाड्यात ये येऊ नका असं म्हटलेलं नाही. पण मी म्हटलं तर अवघड होईल. असं जरांगे म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांना आव्हान

कुणबींनी मराठ्यांपासून सावध रहा असं आंबेडकरांनी म्हटल्यानंतर मी माझा आरक्षण ओबीसी मधूनच घेणार असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचे म्हटले. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत . त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचे खळबळजनक विधान वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

राम कदमांवर जरांगेंनी ओढले ताशेरे

आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत मनोज जरांगे यांनी निशाणा साधलाय. त्यांच्याबद्दल चांगलं मत असताना त्यांनी कशाला यात उडी घ्यावी असं म्हणत रात्रंदिवस हे भाकरी खात नाही ताकच पितेत. मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही. मला माझा मराठा मोठा करायचा आहे हे मी ठरवलंय. असे जरांगे म्हणाले.

हेही वाचा:

Prakash Ambedkar On OBC : ओबीसी आरक्षणाला 100% धोका,प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget