एक्स्प्लोर

Navneet Rana : नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, 'त्या' अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, कठोर कारवाई करण्याची मागणी

Navneet Rana : संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा तसेच त्यांना निलंबित करत तात्काळ कारवाई करा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केलीय. 

Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहलंय. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी केलीय. तसेच दंडासह कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.

नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

15 नोव्हेंबर 2020 रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस वाहनात खासदाराला बसवून नेल्याने आणि मुंबईला जात असतांना जबरदस्तीने थांबविणे, सोबतच पोलीसांनी अपशब्द वापरल्याचं खासदार नवनीत राणा यांनी अशी तक्रार केली होती. यावर खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, 15 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी आम्ही मुंबईसाठी निघत होतो, तेव्हा पोलीसांनी एका क्रिमिनल आरोपींसारखं पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले आणि तिथं अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले. मी मागास-अनुसुचित जातीची असल्याने माझ्यासोबत अपशब्दांचा वापर पोलीसांकडून करण्यात आला. तसेच मला अपमानित करण्यात आले. या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा तसेच त्यांना निलंबित करत तात्काळ कारवाई करा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केलीय. आम्ही शांततेत मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांना निवेदन देणार होतो. पण पोलिसांनी आम्हाला चार तास पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात बसून ठेवलं. याचीच तक्रार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आणि त्या तक्रारींवर लोकसभा सचिवालय यांनी 9 मार्चला हजर राहण्याची नोटीस दिली आहे. नवनीत राणा स्वतः यावेळी तिथं हजर राहणार आणि या अधिकाऱ्यांना निलंबित केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणांच्या तक्रारीवरून अमरावती (Amravati) पोलीस आयुक्त, मुंबई (Mumbai) पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त अमरावती यांना लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. 

प्रकरण काय आहे?

2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली. 14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते. पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते.

निलंबनाची कारवाई करायला लावणार

यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?

MLA Houses In Mumbai : "आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर..." जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट

मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे

माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget