एक्स्प्लोर

ठाकरे-शिंदे गटातील वादाचा कामगारांना फटका! नाशिक म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेचे कार्यालय बंद; प्रकरण पोलीस ठाण्यात 

ज्या कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली त्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर दोन्ही संघटनांनी हक्क सांगितल्यानं हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे.

Nashik News Update:  शिंदे आणि ठाकरे गटाच्या (Shinde Thackeray Group) वादात नाशिक म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेचे कार्यालय सील करण्यात आले आहे. ज्या कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली त्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर दोन्ही संघटनांनी हक्क सांगितल्यानं हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. या वादामुळं कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठीचं व्यासपीठच बंद झालं आहे. त्यामुळं आता हा वाद कसा आणि कधी मिटणार याकडे लक्ष लागून आहे. 
 
दोघांच्या भांडणात तिसऱ्या लाभ होतो असे आपण ऐकत आलोय. मात्र इथे उलटे झाले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या भांडणाचा कामगारांना फटका बसतोय. महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदावर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटाच्या महानगर प्रमुखांनी दावा सांगितला आहे.

सध्याचे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे शिवसेनेचे नगरसेवक आणि संघटनेचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अध्यक्ष पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर बडगुजर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यालयात प्रवेश केला. मात्र बडगुजर यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर असून कार्यालयाचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केला. त्यात आमचे महत्वाचे कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप प्रविण तिदमे यांनी केला असून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
ठाकरे गटाने पलटवार केला असून कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्ष पद स्वीकारले आहे. तसेच कार्यालयात प्रवेश करताना पोलीस प्रशासन, कामगार उपायुक्त कार्यालय सर्वांना पत्र देऊन प्रवेश केल्यानं फौजदारी कारवाई होऊ शकत नाही असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
 
कामगार संघटना अध्यक्ष पदाच्या वादवरून दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही गटात वादाची पहिली ठिणगी पडली असून पोलीस ठाण्यात वाद पोहचला आहे. कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी अध्यक्षाच्या कार्यालयाला सील लावले आहे, न्यायालकडून किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून न्याय निवडा होत नाही तोपर्यंत सील काढलं जाणार नसल्याची नोटीस लावण्यात आल्यानं कामगारांना त्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी न्याय हक्कासाठी व्यासपीठ मात्र बंद झालं आहे.  

ही बातमी देखील वाचा- Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निलेश गाढवे, विश्वस्त निवडीवरून त्र्यंबकवासीय नाराज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
Embed widget