शिंदे सरकारकडून मविआ सरकारचे अनेक निर्णय रद्द, मात्र अशोक चव्हाणांच्या 728 कोटीच्या योजनेला मंजुरी
राज्य शासनाने महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील वॅाटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. मात्र अशोक चव्हणांच्या (Ashok Chavhan) मतदारसंघातील वॉटर ग्रीड योजना मंजूर झाली असून त्याचे टेंडरही निघावे आहेत, त्यामुळे शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर मेहेरबान आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील वॅाटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. त्याचे टेंडर देखील गेल्या महिन्यात निघाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांचे भाजपा बरोबर असलेल्या चांगल्या संबंधाचा परिणाम असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदे फडणवीस सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील 183 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 'वॉटर ग्रीड' योजना मंजूर केला. 728 कोटींचा शासन निर्णय चक्क 14 जुलै रोजी म्हणजे नवे शिंदे सरकार स्थापन झाल्यावर 15 दिवसात काढण्यात आला. . या निर्णयाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यात 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या पाचव्या उमेदवाराचा आश्चर्यकारक विजय झाल्याने काँग्रेसची जवळपास सहा ते सात मते फुटली असा जाहीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. न्यायालय व राज्यपालांच्या निर्देशानुसार नव्या सरकारचा 4 जून रोजी विश्वासदर्शक ठराव पार पडला. त्यालाही अशोक चव्हाण हे गैरहजर राहिले होते. भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत तशी सूचक वक्तव्य केली आता ही योजना मंजुर झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
भोकर हा मतदारसंघ परंपरागत चव्हाणांचा मानला जातो. शंकरराव चव्हाणांनी या मतदार संघातून विधान सभेत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर अशोक चव्हाणांनी प्रदीर्घ काळ या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :