एक्स्प्लोर

Manoj Jarange speech : उपोषणाला किंवा गुलाल उधळायला, आझाद मैदानात येणारच, मनोज जरांगे यांचे 10 मोठे मुद्दे

Manoj Jarange speech Vashi Navi Mumbai : ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं आहे, पण आम्हाला अध्यादेश हवा आहे. सरकारने उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 12 पर्यंत अध्यादेश द्यावा, अन्यथा आम्ही मुंबईत घुसू असं मनोज जरांगे म्हणाले. उपोषणाला नायतर गुलाल उधळायला, आझाद मैदानात येणारच, असं मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange speech Vashi Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chaowk) आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी कालपासून अनेक शिष्टमंडळं पाठवण्यात येत आहेत. त्यांच्याशी मनोज जरांगे यांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्याबाबतही मनोज जरांगे यांनी आपल्या वाशीतील भाषणात सविस्तर सांगितलंचं, पण यावेळी त्यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारने काय मान्य केलं हे सुद्धा वाचून दाखवलं. 
 
ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं आहे, पण आम्हाला अध्यादेश हवा आहे. सरकारने उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 12 पर्यंत अध्यादेश द्यावा, अन्यथा आम्ही मुंबईत घुसू असं मनोज जरांगे म्हणाले. उपोषणाला नायतर गुलाल उधळायला, आझाद मैदानात येणारच, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या भाषणातील मोठे मुद्दे

1) सरकारकडून सचिव भांगे यांच्यामार्फत चर्चा

मनोज जरांग म्हणाले,  शासनाच्यावतीने आपल्या मुद्द्यावर चर्चा झाली. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या. त्यासाठी आपण मुंबईला आलो आहे. सरकार सोबत चर्चा झाली. मंत्री कुणीही आले नव्हते. सचिव भांगे हे सर्व चर्चेत सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांचे काय काय निर्णय आहेत, याबाबत आपल्याला सांगितलं. आमच्याकडूनही  ते अर्धवट वाचण्यात आले होते. प्रत्येक माणूस झोपेतूनच ताटलेला आहे.  

2) ग्रामपंचायतीमध्ये नोंदी चिकटवा, शिबीरं घ्या

 सरकारने त्यांची भूमिका सांगितली. आपली भूमिका तुमच्यासमोर सांगतो. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या (कुणबी) खरेच सापडल्या आहेत. ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या. नोंद नेमकी कुणाची हे माहिती करायची असेल. तर त्या ग्रामपंचायला मिळालेले कागद चिटकावयाला हवे. तरच नोंदी सापडली का नाही हे माहित होईल. तरच तो व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल. काही जणांनी अर्ज केले नाहीत, असे सांगितलं. पण नोंद मिळालेली माहितच नाही, तर तो अर्ज कसा करेल. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही नोंदीची कागदे चिटकवा. अन् शिबिरं घ्या.

3) नोंदी मिळालेल्या सर्व परिवाराला प्रमाणपत्र

ज्या नोंदी मिळाल्या आहेत. ज्या नोंदी मिळालेल्या सर्व परिवारालाही त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र द्यावे. जसी की एक नोंद मिळाली तर काही जणांना एका नोंदीवर अनेकांना लाभ मिळाला. एका नोंदीवर पाच जणांना सरासरी फायदा झाला तर दोन कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे दोन मुद्दे स्पष्ट झाले. 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांना प्रमाणपत्र वितिरित करा. वंशावळ जोडायला, काही कालावधी लागतो. त्यासाठी समिती गठित केल्याचं शासन निर्णयात सांगितलं.

4) 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत 

54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचं वाटप सुरु आहे. त्याच्या परिवाराला जर द्यायचं असेल तर त्याच परिवाराने अर्ज करणेही गरजेचं आहे. एखाद्याची नोंद मिळाली तर कुटुंबातील इतर व्यक्तींनं अर्ज करणं गरजेचं आहे. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं मिळेलं. 57 लाख नोंदी मिळाल्याचे सामान्य प्रशासानाचे सचिवांनी सांगतिले. 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितिरित केल्याचं सचिवांनी सांगितलं.

5) ज्यांना प्रमाणपत्र दिलं, त्याची यादी द्या

37 लाख लोकांना आतापर्यंत वितिरित केले आहे. त्याचेही पत्र आपल्याकडे दिले आहे. त्यांच्या वंशावळी जुळवणं सुरु आहे. त्यासाठी समिती केली आहे. उर्वरित सर्वांनाही प्रमाणपत्र देऊ असे शासनाने सांगितले. ज्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्याची यादी मागितली आहे.

6) ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या

शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीने काम वाढवत राहायचं आणि नोंदी शोधायचं. मराठवाड्यात नोंदी कमी राहिल्या आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी काम करायचं. दोन महिन्याची शिंदे समितीची मुदत वाढवली आहे.ज्याची नोंद मिळाली, त्याच्या गणगोत्यातील सोयऱ्यांनाही त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची, त्याचा आध्यादेश, शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय सोयऱ्यांचा नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. सरकारचा येणाऱा जीआर आपल्यासाठी महत्वाचा आहे. 54 लाख बांधवांच्या परिवाराच्या परिवारात नोंदी दिल्यात. त्याचा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयरे... यांना जर द्यायचा असेल. तर त्यांच्याकडे नोंद नाही. ज्या मराठा समाजाकडे नोंदी नाहीत... नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचं हा माझा सोयरा आहे. त्याआधारावर प्रमाणपत्र द्यायचं. 

लोकं म्हणातात आरक्षण मिळत नाही मग 57 लाख काय आहे. यांच्या माध्यमातुन प्रत्येकाला 5 जण पकडले तर अडीच कोटी आरक्षणात गेले.

7) शपथपत्रावर सांगा हा माझा सोयरा, मगच प्रमाणपत्र द्या 

शपथपत्रावर सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची चौकशी करा. तो खोटा पाहुणा निघाला तर देऊ नका. शपथपत्र 100 रुपयांच्या बाँडवर करायचं, असे त्यांचं म्हणणं आहे. हे मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यावर सरकारने होकार दिला आहे.

8) आंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या 

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे, ही मागणी आहे.   गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून निर्देश दिले आहेत. याबाबतचं पत्र हवे. ते पत्र नाही. त्या पत्राची तयारी सरकारने करावी.

9) सुप्रीम कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत १०० टक्के मोफत शिक्षण  

क्यूरीटिव्ह पीटीशन विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना 100 टक्के मोफत शिक्षण द्यावं. ते आरक्षण मिळेपर्यंत ज्या सरकारी भरत्या होणार आहेत त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत आणि जर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवायच्या.

10) उद्या 12 पर्यंत अध्यादेश हवा, अन्यथा आझाद मैदानात जाणार

आज रात्री अध्यादेश काढला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार आहे. मी सकाळीं 11 पासून उपोषण सूरू केलं आहे. मी आता पाणी देखील सोडुन देइल. माझा मराठा समाज न्यायासाठी इथ आला आहे. जर आम्हाला काही केलं तर मुंबईत घुसू. जर काही झालं तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने मुंबईचा दिशेने या.  उद्या 12 पर्यंत अध्यादेश हवा नाहीतर आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहोत . मला अध्यादेश हवा.

1884 सालच गॅझेट आहे ते लागू करा. महाराष्ट्रातील एक ही मराठा आरक्षणापासुन वंचित राहू शकतं नाही. आता 54 लाख नोंदीचा डेटा हवा आहे. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती अम्ही कष्टकरी लोक आहोत. आजचा रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. सरकारच असं म्हणणं आहे की अध्यादेश करणार आहेत. यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत. माझं म्हणणं आहे की अध्यादेश आजचा आज काढा. आम्ही आज आझाद मैदानात जात नाही मात्र मुंबई आम्ही सोडत नाही. आजची रात्र इथच राहतो

जिल्हास्तरावर वस्तगृहाची मागणी केली आहे. त्याबाबत निर्णय घेतो म्हणाले पण आध्यादेश नाही. आपल्या तीन प्रमुख मागण्या आहेत. सरकारकडून अद्याप शासन निर्णय काढलेला नाही.

एसईबीसीच्या नियुक्त्या होत्या 2014 साली असणाऱ्या त्या त्वरित देण्यात याव्यात. ईएसबीसी आणि एसईबीसीची पदं आहेत ती पूर्ण करावीत. वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या देण्यात याव्यात अशी घोषणा केली आहे. 

लोकं म्हणातात आरक्षण मिळत नाही मग 57 लाख काय आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येकाला 5 जण पकडले तर अडीच कोटी आरक्षणात गेले.1884 सालच गॅझेट आहे ते लागू करा. महाराष्ट्रातील एक ही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकतं नाही. आता 54 लाख नोंदीचा डेटा हवा आहे. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती अम्ही कष्टकरी लोक आहोत. आजच रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. सरकारच असं म्हणणं आहे की अध्यादेश करणार आहेत. यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत. माझं म्हणणं आहे की अध्यादेश आजचा आज काढा. आम्ही आज आझाद मैदानात जात नाही, मात्र मुंबई आम्ही सोडत नाही. आजची रात्र इथच राहतो. उपोषण सोडणार नाही, फक्त पाणी पितोय.

आपल्या पासून मुंबईकराना त्रास होऊ द्यायचा नाही. आझाद  मुंबईचा निर्णय आपण उद्या घेणार आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange speech Navi Mumbai VIDEO : मनोज जरांगे यांचं नवी मुंबईतील भाषण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget