Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' आज दिवसभर एबीपी माझावर, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती
Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद, आज दिवसभर एबीपी माझावर माझा महाराष्ट्र माझं व्हिजन.
LIVE

Background
Majha Maharashtra Majha Vision 2023: उद्योगमंत्री बदलला तरी व्हिजन बदलायला नको, संजय राऊतांची अपेक्षा
राज्याचा उद्योगमंत्री बदलला तरी किमान पाच वर्षे तरी व्हिजन बदलायला नको असं खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईमुळे देशाचं पोट भरतंय, पण मुंबईला वाटा मिळतोय का? महाराष्ट्राला त्याचा वाटा मिळतोय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
Sanjay Raut: उद्योगमंत्री बदलला की व्हिजन बदलतं, ते व्हायला नको: संजय राऊत
व्हिजन हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे, एका व्यक्तीचं नको. उद्योगमंत्री बदलला की व्हिजन बदलतंय ही गोष्ट बरोबर नाही. उद्योगमंत्री कुणीही असो, व्हिजन कायम असायला पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. व्हिजन या शब्दाचा अर्थ बदलला, सत्ता मिळवणं हेच व्हिजन आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचं हे त्या पुढचं व्हिजन असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.
साल 2000 पासून साल 2022 पर्यंत प्रदूषणाच्या मृत्यूमध्ये 300 पट वाढ: सुधीर मुनगंटीवार
साल 2000 पासून साल 2022 पर्यंत प्रदूषणाच्या मृत्यूमध्ये 300 पट वाढ झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. यावर आज लक्ष दिल नाही, तर आपण ताटात जितकं अन्न घेतो, तितकंच आपल्याला औषध खावं लागेल, अशी अवस्था दूर नाही, असं सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
जे 40 सोडून गेलेत, त्यातील सहा सात कसे बसे निवडणून येतील - जयंत पाटील
भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपनं जसे लोकसभेसाठी मतदारसंघ टार्गेट केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही. भाजपच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार असेल. 2019 जसं सरप्राइज मिळालं, तसेच पुन्हा 2024 मध्ये मिळेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जे जे शिवसेनेला सोडून गेलेत, त्यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. आता जे 40 सोडून गेलेत, त्यातील सहा सात कसे बसे निवडणून येतील, उरलेले सर्व पराभूत होतील, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं उत्तर देणार?
भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपनं जसे लोकसभेसाठी मतदारसंघ टार्गेट केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
