Maharashtra Weather : मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
IMD Rain Alert : पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आज आणि उद्या मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचं आयएमडी (India Meteorological Department) ने सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज
रविवारी संध्याकाळी झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विविध भागांना भीषण पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातील उपवन तलाव आणि वंदना सिनेमाच्या आसपास सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, ढगाळ वातावरण राहील असंही, हवामान विभागाने म्हटलं आहे.
#WATCH | Maharashtra: Rain lashes parts of Mumbai.
— ANI (@ANI) November 26, 2023
IMD has predicted heavy rains, thunderstorms and hail storms in parts of Maharashtra today. pic.twitter.com/euy7IV9Cet
'या' जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन
IMD नुसार, महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
#WATCH: Several parts of Mumbai received heavy rainfall today leading to waterlogging in some areas. Visuals from Sion-Matunga road.
— ANI (@ANI) September 22, 2020
India Meteorological Departmemt (IMD) predicts 'generally cloudy sky with heavy rain' for Mumbai tomorrow. pic.twitter.com/6B5je5m4g7
मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता
आज, मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये रविवारी जोरदार पाऊस पाहायला मिळाला. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल झाल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईत रविवारी संध्याकाळी पाऊस झाला आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आज आणि उद्या मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे.
'या' भागात जोरदार पावसाचा अंदाज
कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.