Sharad Pawar On Dasara Melava: 'शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित' दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar On Dasara Melava: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दो
Sharad Pawar On Dasara Melava: मुंबईतील (Mumbai) शिवजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेकडून (Shiv Sena) भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावर महापालिकेनं निर्णय घेत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिलीय. मात्र, अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्याकरता कोणत्याच मैदानाचा अर्ज मंजुर झालेला नाही. ज्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
"दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिंदेंना बीकेसीचे मैदान दिले आता त्यांनी विरोध करू नये", असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेचभाजपकडून सत्तेचा गैरवापर होतोय. कोणतंही कारण नसताना संजय राऊतांना आम्ही वाऱ्यावर सोडलं असं बोललं जातंय. याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक, यांनाही विनाकारण जेलमध्ये टाकलंय, असा आरोप पवार यांच्याकडून करण्यात आलाय.
2024 च्या निवडणुकीबाबत शरद पवार काय म्हणाले?
दरम्यान, 2024 मध्ये एकत्रित निवडणूक लढवतील का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, एकत्रित काहीतरी करावं, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांनी भेट घेऊन आपपली मत मांडली आहेत. पण अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शीवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यसाठी आम्हालाच परवानगी मिळायला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएकडून परवानगी मिळाली असली तरी दसरा मेळावा आणि शिवसैनिक यांचं नातं पहाता शिंदे गटाचा दसरा मेळावाही शिवतीर्थावरच होणार असा दावा शिंदे गटाकडूनही करण्यात येत आहे. दसरा मेळावा हा शिवाजी पार्ककवच होणं हे दोन्ही गटांसाठी आता प्ररिष्ठेचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे एक पर्यायी अर्ज मंजूर झाला असला तरी वाद शमलेला नाही. आता शिवाजी पार्कवर सभेसाठी नेमकी कुणाला परवानगी मिळते याकडे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा-