Nitin Gadkari : ...तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल व सिलेंडरचा दर स्वस्त होईल.
![Nitin Gadkari : ...तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य Maharashtra Political marathi news If there was no shortage of coal today, Nitin Gadkari statement regarding load shedding in state Nitin Gadkari : ...तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/09/26101322/1-central-minister-nitin-gadkari-reveals-why-pm-narendra-modi-then-visted-pakistan-to-meet-nawaz-sharif.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitin Gadkari : कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता असे मत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. गडकरी नागपुरात वेस्टर्न कोल फिल्डसच्या सीएसआर फंडातून दिव्यांग लोकांना विविध साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरिबांना स्वस्त वीज : गडकरी
कोळशा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्सने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. मात्र, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या कोळशात दगडही पाठविले जातात. नाशिक-कोराडीतील औष्णिक वीज प्रकल्पात कोळशातून आलेले दगडाचे ढीग पाहायला मिळतात, या कडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
शासनाचा कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय
ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत. त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी खाजगीकरणाचा वापर करून पाहावा असा सल्ला ही गडकरी यांनी यावेळी दिला. शासनाने कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेस्टर्न कोल फ्लिड्सने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल व सिलेंडरचा दर स्वस्त होईल. तसेच खाणींमधून निघालेल्या मातीतून रेती वेगळी करून ती स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिली तर गरिबांचा फायदा होईल आणि रेती माफियांचा काळा बाजार नियंत्रणात राहील असे ही ते म्हणाले. वेस्टर्न कोल फिल्डस ने आपल्या रिकाम्या जागा, टेकड्या सामाजिक संघटनांना वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्याव्यात असा सल्ला ही गडकरी यांनी दिला.
संबंधित बातम्या
रोहित तू बिंदास्त जा, सांगितलेलं काम झालं असं समज... नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा रोहित पाटील यांच्याकडून शेअर
MNS-BJP : आगामी काळात मनसे-भाजप खरंच एकत्र येणार की छुपी युती साधणार?
PHOTO : 'शिवतीर्थ'वर डिनर डिप्लोमसी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची भेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)