एक्स्प्लोर

MNS-BJP : आगामी काळात मनसे-भाजप खरंच एकत्र येणार की छुपी युती साधणार?

नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीची चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे आगामी काळात खरंच मनसे-भाजप एकत्र येणार की छुपी युती साधणार हे पाहावं लागेल.

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आता वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांच्या घरी भाजपच्या नेत्यांच्या वाढत जाणाऱ्या भेटी नक्कीच आगामी काळातील युतीचे संकेत दर्शवत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी देखील 20 फेब्रुवारीला राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. लवकरच मुंबईसह राज्यातील अनेक बड्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुंबईसह नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे महापालिकेतील मनसेचं प्राबल्य पाहता भाजपला याचा युतीचा फायदा होण्याची शक्यता दाट आहे.

मुंबईत मराठी मतं 36 टक्के आहेत. ती मिळवायीच असतील आणि शिवसेनेची पोकळी भरायची असेल तर नक्कीच मनसेची साथ भाजपला फायदेशीर ठरणारी आहे. शिवाय नाशिक भेटीत माध्यमांशी बोलताना मनसे आपली उत्तर भारतीयांबाबतची भूमिका बदलण्यास तयार असेल तर आगामी काळात चित्र वेगळं असेल, या चंद्रकांत पाटील यांच्या शंकेचं निरसन देखील राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कारण त्यांनी मुंबईत येणारे लोंढे कमी करण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहारमध्ये उद्योग उभारले, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेसोबतच्या युतीचा भाजपला कोणता फायदा? 

1) भाजपला मुंबईतील मराठी मतं मिळू शकतील

2) युती तुटल्यामुळे शिवसेनेची पोकळी भरण्यास भाजपला मदत

3) शिवसेनेच्या मतांची विभागणी होईल

4) शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या भागात मनसेला भाजपची साथ मिळेल

आगामी काळात राज्यात पार पडत असलेल्या 12 महानगरपालिकांमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व असणाऱ्या महापालिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी मनसेला सोबत घेऊन भाजपला फारसा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केवळ मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांसाठी छुप्या युतीचा पर्याय भाजप अवलंबण्याची शक्यता नाकरता येणार नाही.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget