एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 24 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Background

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 40 हजार 805 नव्या रुग्णांची भर पडली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27,377 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

राज्यात आज 44 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.89 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 67 हजार 955 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के झाले आहे.  सध्या राज्यात 20 लाख 86 हजार 24 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3377 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

मुंबईत तिसरी लाट ओसरताना

मुंबईत गेल्या 24 तासात 2250 नव्या रुग्णांची वाढ झालीय. तर, 13 मृत्युची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 217 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 वर पोहचलीय. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झालेत आणि 16 हजार 535 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 19 हजार 808 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.  

मुंबईमध्ये तब्बल 321 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईपाठोपाठ नागपूरात 62, पुण्यात 13, वर्ध्यात 12, अमरावतीत 6 आणि भंडारा, नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2759 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1009 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही मुंबई शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल पुण्यात 1002 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

19:26 PM (IST)  •  24 Jan 2022

परभणी जिल्ह्यात 24 तासात 301 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

परभणी जिल्ह्यात 24 तासात 301 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 96 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2234 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

19:05 PM (IST)  •  24 Jan 2022

आज दिवसभरात अकोल्यात 215 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 215 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2595 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

18:46 PM (IST)  •  24 Jan 2022

पुण्यात गेल्या 24 तासात 3377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 3931 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 3377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3931 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 554255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 46302 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 12543 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

18:18 PM (IST)  •  24 Jan 2022

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 881 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

16:41 PM (IST)  •  24 Jan 2022

मुंबईत ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे 88 टक्के

मुंबईत ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे 88 टक्के,  तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे प्रमाण सुमारे 10 टक्के रुग्ण आढळले आहेत.  कस्तुरबा  प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगचा अहवालात ही माहिती समोर आली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवानाThane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget