एक्स्प्लोर

Who is Bollywood No. 1 Actor : शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं

Mukesh Chhabra Bollywood No. 1 Actor : बॉलिवूडमध्ये सध्या आघाडीचा, नंबर वनवर असलेला अभिनेता कोण याची चर्चा रंगत असते. त्यासाठी वेगवेगळे दावे केले जातात. आता, बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी यावर भाष्य केले.

Mukesh Chhabra Bollywood No. 1 Actor : बॉलिवूडमध्ये सध्या आघाडीचा, नंबर वनवर असलेला अभिनेता कोण याची चर्चा रंगत असते. त्यासाठी वेगवेगळे दावे केले जातात. आता, बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra) यांनी यावर भाष्य केले.   मुकेश छाब्रा यांनी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे. त्यांनी चित्रपटांसाठी केलेले कास्टिंग चांगलेच हिट  ठरले. मुकेश छाब्रा यांनी बॉलिवूडमध्ये सध्या कोणता अभिनेता पहिल्या क्रमांकावर आहे हेदेखील सांगितले.  

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, रणबीर कपूर सध्या बॉलिवूडमधील नंबर वन अभिनेता आहे. छाब्रा यांनी रणबीर कपूरचे कौतुक करताना सांगितले की, सोशल मीडियावर रणबीरचीच हवा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Chhabra Mukesh Csa (@castingchhabra)

रणबीर कपूर हा नंबर 1 

'पिंकविला'शी बोलताना मुकेश छाब्रा यांनी अनेक गोष्टी शेअर केल्या आणि रणबीर कपूरचे कौतुकही केले. रणबीर कपूरचे कौतुक करताना मुकेश छाब्रा  म्हणाले की, 'मला वाटते रणबीर कपूरचा चार्मच असा आहे की लोक त्याला पाहण्यासाठी  उत्सुक असतात. त्याच्या चित्रपटाची उत्सुकता असते.  मला वाटतं रणबीर कपूर सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

रणबीर कपूरचे कौतुक करताना मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, तो अभिनयात जबरदस्त आहे, तो अप्रतिम दिसतो आणि लोकांना त्याचा डाउन टू अर्थ स्वभाव आवडतो. रणबीरला सार्वजनिक ठिकाणी पाहिल्यास तो सर्वांशी खूप प्रेमाने वागतो, असेही छाब्रा यांनी म्हटले. 

या मुलाखतीत मुकेश छाब्रा यांनी सांगितले की,  पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवण्यासाठी रणबीरला अनेक वर्ष लागली पण त्याने करून दाखवलं. 

शाहरुखबद्दल काय म्हणाले छाब्रा?

शाहरुख खानबद्दल मुकेश छाब्रा म्हणाले की, आता त्याच्यासारखे स्टारडम कदाचितच इतर कोणत्या अभिनेत्याला मिळू शकेल. शाहरुखने स्टारडमची गाठलेली उंची ही इतर कोणी कदाचितच गाठू शकेल असे त्याने म्हटले. 

कोण आहे मुकेश छाब्रा?

मुकेश छाब्रा हे अनेक वर्ष सिनेइंडस्ट्रीमध्ये  कास्टिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काही चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा (2020) याचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.  त्याशिवाय, 'गँग्स ऑफ वासेपूर', 'रंग दे बसंती', 'हायवे' या सारख्या चित्रपटासाठी कास्टिंग त्यांनी केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Embed widget