Maharashtra breaking News Live Updates : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटप चालू आहे. आतापर्यंत भाजपाने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षानेदेखील आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. 22 ऑक्टोबरच्या रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानेदेखील आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुलनेने सुरक्षित आणि कोणताही वाद नसेलेल्या मतदारंसघांचा समावेश आहे. दरम्यान आज महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Boisar Vidhan Sabha Election : बोईसर विधानसभेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात असंतोष, कार्यकर्ते नाराज
पालघर -
बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटात असंतोष .
बोईसर विधानसभेसाठी भाजपकडून दावा करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज .
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटक जगदीश धोडी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी .
जगदीश धोडी बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवार .
उमेदवारी न दिल्यास जगदीश धोडी यांनी वेगळा विचार करण्याच कार्यकर्त्यांचा आवाहन .
Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार
संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची (ठाकरे गट) युती तुटणार
संभाजी ब्रिगेड 50 च्या वर उमेदवार जाहीर करणार
शिवसेनेबरोबर असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार
संभाजी ब्रिगेडला असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिली जात नाही
अडीच वर्ष असणारी युती तुटणार
संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार
प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार
शिवसेनेला मोठा धक्का
संभाजी ब्रिगेडचे एक शिष्टमंडळ मनोज जारंगेंना भेटलं
आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड जरांगें बरोबर जाणार
Sulabha Ghodke To Joins Ajit Pawar NCP : सुलभा खोडके यांचा थोड्याच वेळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश, अमरावतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
सुलभा खोडके यांचा थोड्याच वेळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार पक्ष प्रवेश
संजय खोडके आणि पत्नी सुलभा खोडके राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या पक्ष कार्यालयात दाखल
सुलभा खोडके यांना अमरावतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
Dharashiv : ऐन निवडणुकीत धाराशिवचे निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव वैद्यकीय रजेवर
धाराशिव : ऐन निवडणुकीत धाराशिवचे निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव वैद्यकीय रजेवर
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी पुण्यात दाखल आहे गुन्हा,यादव यांचा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात माञ वैद्यकीय रजेची नोंद
K P Patil : कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार के पी पाटील यांचा आज ठाकरे गटात पक्षप्रवेश
कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार के पी पाटील यांचा आज ठाकरे गटात पक्षप्रवेश
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर दुपारी १ वाजता पक्षप्रवेश
के पी पाटील यांना राधानगरी विधानसभा मतदारसंघातून दिली जावू शकते उमेदवारी
विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे
त्यामुळं इथून के पी पाटील यांना प्रवेश देवून उमेदवारी दिली जाणार