एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Winter Session 2022: 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही, सभागृहात CM एकनाथ शिंदे कडाडले

Maharashtra Assembly Winter Session 2022: नागपूर न्यास जमीन प्रकरणातील विरोधकांचे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Maharashtra Assembly Winter Session 2022: नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणात आज सकाळी विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून विधानसभेतही प्रयत्न सुरू होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते तर उपमुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत उत्तर का दिले, असा सवाल केला. त्यानंतर सभागृहात बोलू दिले जात नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला. 
 
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्यात वाद झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन सादर करताना म्हटले की, 2007 साली 49 ले आऊट मंजूर झाले होते. 2015 साली 34 भूखंडांना त्यावेळी मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी एनआयटीच्या प्रमुखाने त्याला रेडी रेकनरच्या दराने पैसे भरण्यास सांगितले. तर एकाने गुंठेवारीनुसार पैसे भरण्यास सांगितले. त्यावेळी वेगवेगळे दर सांगण्यात आल्याने ते प्रकरण माझ्याकडे अपिलासाठी आले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी शासन निर्णयानुसार आणि तरतुदींनुसार निर्णय घेण्याची सूचना त्यावेळच्या एनआयटी प्रमुखांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, नगरविकास मंत्री म्हणुन मी कोणताही गैरव्यवहार केला नाही.  2009 साली शासनाचे जे दर होते, त्यानुसार रक्कम आकारण्यात आली आहे. ही जमीन कोणालाही बिल्डरला दिली नसल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, 14 तारखेला मला एक पत्र आलं आणि कोणीतरी कोर्टात गेले अहे असं कळलं. एक सदस्याची गिलानी समिती नेमली गेली होती. माझ्यासमोर प्रकरण येत असताना समिती नेमली गेली आहे याची माहिती लपवण्यात आली. त्यानंतर माझ्या निदर्शनास ही बाब आली होती असेही त्यांनी सांगितले. मात्र, आता ही बाब माझ्या लक्षात आणून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जे कोर्टाने आदेश दिले आहेत त्यानुसार कारवाई करावी हा निर्णय 2021 साली मी पारित केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. 

विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील नागपूर न्यास जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावताना विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काल अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये एकनाथ शिंदे सापडला आहे, त्याला धरा असा निर्णय झाला अशी माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नसल्याचे ही त्यांनी सांगितले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्लाबोल केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget