लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार
अजित दादांचा वादा आहे ही या योजना बंद पडू देणार नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल, असे अजित पवार म्हणाले.
![लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार Ladki Bahin Yojna Update Ajit Pawar 50 rupees will be paid separately for filling the form Maharashtra Marathi News लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/22/0909a635ec21ed3af52d4b6efd793cf4172163354824289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, अनेक गोष्टींची पुरेशी माहिती नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यातच योजनेचे अर्ज देण्यासाठी लाच मागत असल्याचं समोर आलं आहे. योजनेचे अर्ज देताना कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी आज दिला. तसेच फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना 50 रुपये वेगळे देत आहोत, त्यामुळे तुम्ही पैसे देण्याची गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
अजित पवार म्हणाले, लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे मागितल्याची अनेक प्रकरणे समोर आली. ग्रामीण भागात काही ठिकाणी फॉर्म भरण्याचे पैसे मागितल्याचे समोर आले आहे. मात्र या योजनेसाठी प्रशासनातील कोणी पैसे मागत असेल असेल तर ते त्याला देऊ नका. फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना 50 रुपये वेगळे देत आहोत. या योजनेसाठी प्रशासनातील कुणी पैसे मागितले तर त्यांच्यावर कडक करावाई करू.
अजित दादांचा वादा, योजना बंद पडू देणार नाही : अजित पवार
अजित पवार म्हणाले. मुलगी जन्माला आली तर अनेक कुटुंबात नाक मुरडतात. पण मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या 18 व्या वर्षापर्यंत आम्ही तिला 1लाख 1 हजार रुपये देतो. त्यामुळे महिलांनी या विविध योजनांचा लाभ घ्यायला हवा. महिलांसाठी रिक्षा घेण्यासाठीही पिंक रिक्षा योजना आम्ही आणली. अजित दादांचा वादा आहे ही या योजना बंद पडू देणार नाही. पण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल.
सरकार होत त्यावेळी त्यांनी काही योजना का नाही आणल्या? अजित पवारांचा सवाल
बजेट सादर करताना जी महत्वाची योजना मांडली ती म्हणजे "माझी लाडकी बहीण" योजना... ही योजना कोणत्या जातीचा विचार करून दिलेली योजना नाही. ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलेली योजना आहे. गाव खेड्यापासून शहरातील महिला भगिनींसाठी ही योजना आहे. अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे. या योजनेबाबत महिला भगिनींना जाग करण्यासाठी आम्ही आलोय. महिलांनी ऑगस्टमध्ये जरी या योजनेचा अर्ज भरला असेल तरी जुलैपासून या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेवरून विरोधकांनी टीका केली, पण ही योजना सर्व घटकातील महिलांसाठी आहे. ही योजना कुणासाठी आहे, गोरगरीबांसाठी योजना आहे, तरीही विरोधक आमच्यावर टीका करतात. विरोधक म्हणतात की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांना महिलांचा पुळका आलाय. त्यांचं पण सरकार होत त्यावेळी त्यांनी काही योजना का नाही आणल्या, असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.
शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करण्याची वेळ येणार नाही : अजित पवार
शेतकऱ्यांचे वीज बिल देखील आम्ही माफ केले आहे. साडे आठ लाख सोलर पंप आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. सोलर पंपामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज भविष्यात राहणार नाही. दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करण्याची वेळ पडणार नाही. सोयाबीन , कापसाला साडेचार हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही देतोय. आम्हाला निवडून देताना आमचा एकच ध्यास असतो तो म्हणजे "विकास".. या आधी बघितले तर सरकारने जलसंधारणाची मोठी काम केली.
निळवंडे धरण मी मंत्री असतानाच पूर्ण करून घेतलं आहे, असेही अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar Birthday Video: लाडक्या बहिणींचा लाडका दादा, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले
हे ही वाचा :
'लाडकी बहीण योजने'साठी आत्तापर्यंत किती अर्ज आले?, मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले, विरोधकांनाही सुनावले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)